पुणे : महिलाशक्तीच्या आविष्काराची ओळख बनलेल्या ‘लोकमत वुमेन समीट’चे सातवे पर्व शुक्रवारी होणार आहे. ‘#MeToo ते #WeToo ‘ती’ची बोलण्याची ताकद’ ही या वुमेन समीटची यंदाची संकल्पना आहे. युनिसेफच्या सहयोगाने होणाऱ्या या समीटमध्ये होणाºया चर्चेत मीटू चळवळीला बळ देत ‘ती’ची बोलण्याची ताकद वाढवितानाच समाजाच्या सहभागातून या चळवळीचे स्वरूप ‘वुई टुगेदर’ करण्यासाठी विचारमंथन होणार आहे.मादागास्करच्या भारतातील राजदूत मेरी लिओन्टाईन रझानाद्रासोवा, प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी, राधिका आपटे, तनुश्री दत्ता, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे, प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापक पद्मश्री सुधा वर्गिस, कनकधारा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. लक्ष्मी गौतम, राष्टÑीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, शाश्वत विकास आणि जलव्यवस्थापन तज्ज्ञ रूपाली देशमुख, युनिसेफच्या जेंडर स्पेशालिस्ट अंतरा गांगुली,आशियातील पहिली महिला टॅक्सी संघटना फॉरचीच्या संस्थापक रेवती रॉय, भारतातील सर्वांत तरुण सरपंच जबना चौहान, पुरुष हक्कांसाठी लढणाºया कार्यकर्त्या बरखा ट्रेहान आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.महिलांच्या प्रश्नांचे स्वरूप वैश्विक आहे. महिलांनी विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले. तरीसुद्धा दिवसेंदिवस त्यांच्यावरील अत्याचारांत वाढ होत आहे. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक शोषणासारख्या घटना घडत आहेत. महिलांसाठी असुरक्षित वातावरण तयार होत आहे; पण अंधार दाटल्यासारखा वाटत असताना ‘मीटू’ ही चळवळीसारखी किरणशलाका निघत आहे. पण, त्यापुढे जाऊन ‘वुईटू’ म्हणत समाजानेही या प्रश्नांकडे सजगपणे पाहण्यासाठी वातावरण तयार व्हायला हवे. यासारख्या विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.गेली ६ वर्षे सातत्याने महिला सक्षमीकरणाची चळवळ उभी करणाºया कर्तबगार महिला या राष्ट्रीय परिषदेत सहभागी झाल्या आहेत. याच यशोगाथेचा पुढील टप्पा म्हणून स्त्रीत्वाचा अनोखा आविष्कार यंदाच्या ‘वुमेन समीट’मध्ये अनुभवायला मिळणार आहे.>विशेष संवाद‘लोकमत वुमेन समीट’मध्ये #MeToo ते #WeToo या विषयाबरोबरच महिलांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी बजावलेल्या, चाकोरी सोडून नवे घडविणाºया महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. मान्यवर महिलांशी मोकळेपणाने संवाद साधता येणार आहे.>शाश्वत जीवनाची सूत्रेशाश्वत जीवनाची सूत्रे या विषयावर युनीसेफच्या जेंडर एक्सपर्ट अंतरा गांगुली, लोकमत एडिटोरीअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, अभिनेत्री दिव्या सेठ आणि ‘लोकमत’च्या सहसंपादिका अपर्णा वेलणकर सहभागी होणार आहेत.सहकार्य : सहजीवनाची प्रेरणा या विषयावर प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी संवाद साधणार आहे.नई शुरूवात या विषयावरील परिसंवादात देशातील सर्वांत तरुण सरपंच जबना चौहान, फॉरची या अशियातील पहिल्या महिला टॅक्सी संघटनेच्या संस्थापक रेवती रॉय, कनकधारा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. लक्ष्मी गौतम, उद्योजिका शीतल बियाणी सहभागी होणार आहेत.मी टुगेदर : लढण्याची शक्ती या विषयावरील परिसंवादात प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ता, पुरुषांच्या हक्कासाठी लढणाºया कार्यकर्त्या बरखा ट्रेहान आणि राष्टÑीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा सहभागी होणार आहेत.>अडथळ्यांवर मात करून नवी सुरुवातअडथळे येतातच; पण त्याच्यावर मात करून नवी सुरुवात करण्याची प्रेरणा देणाºया परिसंवादात मादागास्करच्या भारतातील राजदूत मेरी लिओन्टाईन रझानाद्रासोवा, प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापक पद्मश्री सुधा वर्गिस, मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया सहभागी होणार आहेत.
#MeToo ते #WeToo... ‘ती’चा बुलंद आवाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 1:19 AM