स्थलांंतरित पक्ष्यांची जुन्नरसफर; पक्षीप्रेमींसाठी पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:42 AM2019-02-02T01:42:57+5:302019-02-02T01:43:14+5:30

दर वर्षी थंडीमध्ये या परदेशी पाहुण्यांचे आगमन

Migratory birds Junnar; Feast of birds for the birds | स्थलांंतरित पक्ष्यांची जुन्नरसफर; पक्षीप्रेमींसाठी पर्वणी

स्थलांंतरित पक्ष्यांची जुन्नरसफर; पक्षीप्रेमींसाठी पर्वणी

googlenewsNext

- अशोक खरात

खोडद : आजवर विविध वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींनी परिचित असलेला किंवा नैसर्गिक विविधतेने आणि सौंदर्याने ओळखला जाणारा जुन्नर तालुका हा विविध परदेशी पक्ष्यांचा अधिवास म्हणूनही आता ओळखला जाऊ लागला आहे. जुन्नर तालुक्यात सध्या वैविध्यपूर्ण प्रजातींचे अनेक परदेशी पक्षी जुन्नरच्या सफरीचा जणू आनंदच घेत आहेत. दरवर्षी हिवाळ्यात अनेक परदेशी पक्षी जुन्नर तालुक्यात स्थलांतर करीत आहेत. या परदेशी पाहुण्यांचं सौंदर्य जुन्नरकरांना व अभ्यासकांना भुरळ घालत आहे. परदेशी पक्ष्यांच्या सौंदर्याचे उत्कट दर्शन घेण्याची संधी आता जुन्नर तालुक्यात निर्माण झाली आहे.

हिवाळ्यात थंडी वाढत जाते आणि माळरानावरील,डोंगररांगांवरील गवत सुकून पिवळी होतात. याचदरम्यान स्थानिक आणि परदेशी स्थलांतरित पक्षी महाराष्ट्रात दाखल व्हायला सुरुवात होते. जुन्नर परिसरातील परिसंस्था ही घनदाट जंगलं, गवताळ माळरानं आणि पाणथळ जागा अशा विविध अधिवासांनी समृद्ध आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्षी जुन्नर परिसराला पसंती देताना दिसतात. हे पक्षी हिवाळ्यात इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या मूळ प्रदेशात पडलेली कडाक्याची थंडी होय. या प्रचंड थंडीमुळे अधिवासात त्यांच्या बर्फाचे खच पडतात आणि तेथील अन्नाची उपलब्धता कमी होते. त्याच वेळी भारतीय उपखंडात हिवाळा सुरू असतो. यामुळे भारतीय उपखंडात मुबलक अन्न त्यांना उपलब्ध होतं. स्थलांतराचे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रजनन. काही पक्षी भारतीय उपखंडात येऊन अंडी देतात आणि पिलांची वाढ पुरेशी झाली, की ती पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी उडून जातात. जुन्नरमधील धरणांच्या ठिकाणी किंवा पाणथळ ठिकाणी, तसेच पाणवठ्यावर हे पक्षी मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत.

इथली जंगल, माळरानं, तलाव यांसारख्या समृद्ध अधिवासामुळे येथे पक्ष्यांची मोठी रेलचेल असते. चांगल्या पद्धतीने जोपासले तर उत्तरोत्तर या पाहुण्या पक्ष्यांची संख्या आपल्या परिसरात वाढू शकते, जुन्नर हा धरणांचा तालुका असल्याने एखादे स्थलांतरित पाणथळचे पक्षी अभयारण्य उदयास येऊ शकते.
- राजकुमार डोंगरे, खोडद
पक्षीनिरीक्षक

फ्लेमिंगोसारखे पक्षीदेखील दरवर्षी आपल्या तालुक्यात येतात, ही जुन्नरवासीयांसाठी केवळ भाग्याची बाब आहे. पक्ष्यांच्या होणाऱ्या शिकारी थांबविण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.
सुभाष कुचिक, खोडद
पर्यावरण अभ्यासक

Web Title: Migratory birds Junnar; Feast of birds for the birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Junnarजुन्नर