शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

बेकायदा जाहिरात फलकांमुळे पुणे महापालिकेचे लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 8:12 PM

बीआरटी मार्गातील स्थिती : प्रशासनाने केलेय सोयीस्कर दुर्लक्ष

ठळक मुद्देबीआरटी मार्गांमध्ये जाहिरात फलक उभारण्याकरिता आकाशचिन्ह विभागाची मान्यता आवश्यकअधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने हा गोरखधंदा सुरु असल्याचा आरोप

पुणे : शहरातील बीआरटी मार्गांमध्ये जाहीरात फलक लावण्यास मान्यता नसतानाही विविध ठिकाणी जवळपास 38 अनधिकृत जाहिरात फलक उभारण्यात आलेले आहेत. पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असतानाही पालिकेतील वरिष्ठ आणि आकाश चिन्ह विभागाचे अधिकारी डोळ्यावर कातडे ओढून बसले आहेत. अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने हा गोरखधंदा सुरु असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी लेखी प्रश्न विचारला होता. त्याला प्रशासनाने दिलेल्या उत्तरामधून ही बाब उघड झाली आहे. बीआरटी मार्गांमध्ये जाहिरात फलक उभारण्याकरिता पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची मान्यता आवश्यक आहे. ही मान्यता विभागाने दिलेली नाही. तरीदेखील अनधिकृतपणे 38 जाहिरात फलक उभारण्यात आलेले आहेत.    संगमवाडी-विश्रांतवाडी या बीआरटी मार्गावर संगमवाडी अ‍ॅप, संगमवाडी डाऊन, केंद्रीय विद्यालय, डेक्कन कॉलेज, आंबेडकर सोसायटी, होमगार्ड ऑफिस, फुलेनगर मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी या ठिकाणच्या बसथांब्यांवर हे अनधिकृत जाहिरात फलक उभे आहेत. ‘येरवडा-आपले घर’ या बीआरटी मार्गावर येरवडा, गुंजन कॉर्नर, वाडिया बंगला, शास्त्रीनगर, रामवाडी जकात नाका, वडगाव शेरी फाटा, विमान नगर कॉर्नर, टाटा गार्डरूम, चंदननगर, खराडी बायपास, जनक बाबा दर्गा, वाघोली जकात नका, आपले घर या ठिकाणी अनधिकृत फलक आहेत. तर स्वारगेट ते हडपसर या बीआरटी मार्गावर वैदुवाडी अ‍ॅप, वैदुवाडी डाउन रामटेकडी अ‍ॅप आणि डाउन, काळुबाई बस स्टॉप येथे विनापरवाना जाहिरात फलक उभारल्याचे पालिका प्रशासनाने दिलेल्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.==== एरवी सर्वसामान्यांचे फलक, बॅनर्स, जाहिराती काढून टाकण्याची तसेच दंडात्मक कारवाई करण्याची तत्परता दाखविणाऱ्या आकाशचिन्ह विभागाने याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. प्रशासकीय अधिकाºयांवर राजकीय दबाव आहे की त्यांचेच हात दगडाखाली अडक लेले आहेत याबद्दल उलटसुलट चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण