अल्पवयीन मुलीचा दगडाने ठेचून खून, चार दिवसांपासून होती बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 08:05 PM2017-12-04T20:05:17+5:302017-12-04T20:05:29+5:30

पुणे : अल्पवयीन १७ वर्षीय  मुलीवर अत्याचार  करून तिचा दगडाने ठेचून निर्दयीपणे खून करण्यात आला. खेड तालुक्यातील धामणे येथे ही घटना सोमवारी उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी  तातडीने  तपास सुरू केला आहे.

Minor girl crushed to death, four days after missing | अल्पवयीन मुलीचा दगडाने ठेचून खून, चार दिवसांपासून होती बेपत्ता

अल्पवयीन मुलीचा दगडाने ठेचून खून, चार दिवसांपासून होती बेपत्ता

googlenewsNext

पुणे : अल्पवयीन १७ वर्षीय  मुलीवर अत्याचार  करून तिचा दगडाने ठेचून निर्दयीपणे खून करण्यात आला. खेड तालुक्यातील धामणे येथे ही घटना सोमवारी उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी  तातडीने  तपास सुरू केला आहे. बेलझुरी परिसरातील  शेतात विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेहापासून दोनशे फुटाजवळ रक्ताने माखलेला दगड व रक्ताचे मोठ्या प्रमाणावर  डाग आढळले आहेत. फेकून दिलेला मोबाईलही सापडला. मुलगी विवस्त्र अवस्थेत असल्याने पोलिसांनी मुलीवर अतिप्रसंग करून  खून  केला असल्याचा  अंदाज  व्यक्त  केला  आहे. 

याबाबत  मिळालेल्या  माहितीनुसार ती मुलगी १  डिसेंबर  रोजी  आईबरोबर शेतात  काम  करण्यासाठी  गेली होती. दुपारी ३ .३० च्या  सुमारास  तिच्या वर्ग मैत्रिणींला शेजारील मुलीचा मोबाईल नंबर देण्यासाठी व  पिण्यासाठी  पाणी  घेऊन  येते  म्हणून ती शेतातून गेली. सायंकाळी ६ .३० वा आई घरी आले असता घरामध्ये मुलगा प्रशांत बसला होता. त्याला विचारले असता, ती घरी आली नाही असे सांगीतले. आजुबाजुला चौकशी केली असता शेजारील अरुणा विष्णु करंडे हिने ४.१५ वा सुमारास  पुन्हा शेताकडे जाताना काळुबाई मंदिरा जवळ पाहिले होते. त्यानंतर ती कोणालाही दिसली नाही.   साधारण याच सुमारास आईला व भावाला तिचा  फोन  आला आला. भावाने तिला पुन्हा फोन  लावला  असता  फोन  बंद  येत  असल्याने कुटुंबियांनी रात्री १ वोपर्यंत  शोध  घेतला. परंतु  ती कोठेच  आढळून  आली  नाही. या नंतर ती गायब असल्याची तकार चाकण  पोलीस  चौकीत   करण्यात  आली. 

चार दिवसांनी सोमवारी (४ डिसेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या  सुमारास  भाऊ  प्रशांत  हा  बरेच  दिवस शेतीला  पाणी  दिले  नाही, म्हणून  पाणी  देण्यासाठी  शेतात  गेला. पाण्याच्या  कॉकजवळ  एक  मृतदेह  त्याला  दिसला. पायात  असलेला  काळा  धागा व   तेथे असलेले त्या  दिवशी  घातलेले  लाल  रंगाच्या ब्लेझर त्याला दिसल्यावर ती बहिणच असल्याची त्याची खात्री झाल्यावर पोलिसांना खबर दिली. 

या वेळी मृतदेह ओळखण्याच्या स्थीतीत नव्हता. चेहरा अत्यंत विद्रुप कलेला अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक मनोजकुमार यादव यांनी घटनास्थळास भेट देऊन तपासाबाबत तातडीने सुचना केल्या. घटनास्थळी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. सगळ्या शक्यतांवर पोलीस शोध घेत असुन मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी चाकण येथे पाठविण्यात आले आहे. या  बाबत  पोलिस निरिक्षक मनोजकुमार यादव साहाय्यक निरिक्षक प्रदिप  पवार, प्रशांत पवार, उपनिरिक्षक  जगताप , पोलीस  हवालदार अनिल ढेकणे, अरुण लांडे अनिल जगताप सतीश जाधव  पुढिल तपास  करत  आहे .

दरम्यान या ठिकाणी असलेल्या एका कंपनीत परप्रांतिय कामगारांवर संशय व्यक्त करीत मोठा जमाव कंपनीबाहेर जमला होता. मात्र पोलिसांनी दक्षता घेत जमावाला शांत केले. 

Web Title: Minor girl crushed to death, four days after missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.