वाघोली: वाघोली (ता: हवेली) येथे अल्पवयीन मुलीला फूस लावून जीवे मारण्याची धमकी देत खाजगी दवाखान्यात गर्भपात केल्याप्रकरणी दोन डॉक्टरसह ११ व्यक्तींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोली येथील वाघेश्वर नगर येथील रहिवासी असलेल्या पीडित मुलीच्या नातेवाईक महिलेने याप्रकाराबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना वाघेश्वर नगर येथे घडली. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारी मध्ये सुभाष शिंदे, अंजना शिंदे,कार्तिक गुंजकर,अंबादास साळुके, पंडित डोंगरे, संतोष पवार,अनिल चौघुले, तुकाराम चौघुले, डॉ.अतुल जाधव, डॉ. ज्योती जाधव (सर्व. रा. वाघेश्वर नगर, वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष शिंदे यांचा मेहुणा कार्तिक गंजकर याच्यासोबत पीडित अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले होते. त्यानंतर त्या पीडित मुलीस तीन महिन्याची गर्भवती ठेवून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन इतरांच्या मदतीने अतुल जाधव या डॉक्टरांकडे नेले व त्या डॉक्टर दांपत्याकडून त्या पीडित मुलीचा गर्भपात केला गेला. याप्रकरणी ११ जणांवर लोणीकंदमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन दिवस उलटूनही कोणासही अटक करण्यात आले नसून पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करत आहेत.......................वाघोली परिसरात अवध्ये गर्भपात केंद्रांवर प्रशासकीय विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे अवध्ये गर्भपात करणा?्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी. वाघोली डॉक्टर संघटनेच्या वतीने याप्रकरणी डॉक्टर दोषी आढळल्यास संघटनेतून निलंबित करण्यात येईल.- डॉ. विनोद सातव (डॉक्टर संघटना वाघोली, कार्याध्यक्ष)----------आरोपींचा तपास चालू असून आत्तापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. घडलेला प्रकार संवेदनशील असल्याने तपासकार्याला वेळ लागत असून लवकरच आरोपीना अटक करण्यात येईल.- सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन
वाघोलीत अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात, डॉक्टरसह ११ व्यक्तींवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 7:31 PM
पीडित अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत खाजगी दवाखान्यात तीन महिन्यांची गर्भवती असताना तिचा गर्भपात केला.
ठळक मुद्देआरोपींचा तपास चालू असून आत्तापर्यंत कोणालाही अटक नाही. याप्रकरणी डॉक्टर दोषी आढळल्यास संघटनेतून निलंबित करण्यात येईल