भोर (पुणे) :काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विविध जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, आणि देत आहेत. पुणे येथील कसबापेठ विधानसभा पोटनिवडणूक निरीक्षक व प्रचाराची जबाबदारी माझ्यावर आहे. मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून कोणत्याही पक्षात जाणार नाही. भाजप प्रवेशाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
येथील सह्याद्री मंगल कार्यालयात भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा व महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालय विभागाच्या शिक्षण शुल्क समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे यांची निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे, उपाध्यक्ष अतुल शेडगे, संचालक विजय शिरवले, पोपटराव सुके, धनंजय वाडकर, अनिल सावले, विठ्ठल आवाळे, कृष्णाजी शिनगारे, बाळासाहेब थोपटे, शिवाजी कोंडे, अंकुश खंडाळे, सुधीर खोपडे, रोहन बाठे, संपत दरेकर, सुभाष कोंढाळकर, आप्पा चव्हाण, समीर सांगळे, उत्तम थोपटे, विठ्ठल वरखडे, सतीश चव्हाण, गिताजंली आंबवले, सुवर्णा मळेकर, नरेश चव्हाण, विठ्ठल खोपडे, सुजाता जेधे, नंदा मोरे, सोमनाथ सोमाणी, वसंत वरखडे यांसह शेतकरी उपस्थित होते.