दौंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांची बसवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 06:41 PM2018-09-10T18:41:23+5:302018-09-10T19:05:43+5:30

सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेर्धात काँग्रेसच्या वतीने पुकारलेल्या बंद दरम्यान मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी दौंड-सिध्दटेक बसवर दगडफेक केली.

MNS workers throw stones on bus In Daund | दौंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांची बसवर दगडफेक

दौंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांची बसवर दगडफेक

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे भारत बंद आंदोलन : परीक्षेला निघालेला विद्यार्थी जखमीचार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

दौंड : सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेर्धात काँग्रेसच्या वतीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी दौंड-सिध्दटेक बसवर दगडफेक केल्याने एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. 
याप्रकरणी मनसेच्या सचिन कुलथे, सागर पाटसकर, जमीर सय्यद, अझर कुरेशी या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा काँग्रेसशी  संबंध नसल्याचा निर्वाळा दौंड शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाबा शेख यांनी दिला आहे. एसटी चालक शिवाजी होले यांनी फिर्याद दिली आहे. 
होले हे सकाळी सिध्दटेक येथून दौंडकडे येण्यासाठी निघाले होते. बसमध्ये विद्यार्थी आणि प्रवासी होते. दरम्यान, येथील संभाजी स्तंभा जवळ विद्यार्थी व प्रवासी उतरले. तर तीन विद्यार्थी आणि दोन प्रवासी बसमध्ये बसलेले होते. बस पुढे डेपोत जायला निघाली तेव्हा येथील शेठ ज्योती प्रसाद विद्यालयाच्या परिसरात मनसेचे पाच ते सात कार्यकर्ते आले. यावेळी होले यांच्या परिचयाच्या कुलथे याने त्याच्या हातातील दगड बसच्या काचेवर मारला. हा दगड बसमध्ये आत पडला. त्यानंतर त्याने हातात असलेल्या बांबूने दुसरी काच फोडली. या घटनेमुळे एक विद्यार्थी जख्मी झाला असून तो ११ वीच्या घटक चाचणीच्या शेवटच्या पेपरला निघाला होता. जखमी अवस्थेतही त्याने महाविद्यालयात जाऊन परीक्षा दिली.

Web Title: MNS workers throw stones on bus In Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.