पनवेल डान्सबारमध्ये राऊतने उडविले पैसे
By admin | Published: December 30, 2014 12:02 AM2014-12-30T00:02:11+5:302014-12-30T00:02:11+5:30
न्यायालयातील निलंबित वरिष्ठ लिपीक दीपक राऊत याने बनावट जामिनासाठी घेतलेले ३ लाख रुपये पनवेल येथील डान्सबारमध्ये उडविले असल्याची कबुली दिली आहे.
पुणे : न्यायालयातील निलंबित वरिष्ठ लिपीक दीपक राऊत याने बनावट जामिनासाठी घेतलेले ३ लाख रुपये पनवेल येथील डान्सबारमध्ये उडविले असल्याची कबुली दिली आहे. तसेच, काही भाग त्याने मित्रांना दिला असल्याचे सांगत आहे. याबाबत पनवेल येथे जाऊन तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. पी. बावस्कर यांनी राऊतची १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे. भिलारेवाडी ग्रामपंचायतीचा उपसरपंच संतोष धनवडे (वय ३६, रा. भिलारेवाडी, ता. हवेली) यांचा १ फेब्रुवारी २०१३ रोजी खून झाला होता. याप्रकरणी राजगड पोलिसांनी प्रवीण विष्णू भिलारे (वय २७, रा. भिलारेवाडी, ता. हवेली) याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली होती. त्यापैकी प्रवीण भिलारे याने जामीन मिळविण्यासाठी केलेला अर्ज तत्कालीन सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर भिलारे याने न्यायालयातील वरिष्ठ लिपीक दीपक राऊत याच्याशी हातमिळवणी केली. जामीन मिळाल्याचा सत्र न्यायालयाचा आदेश घेतला व १ डिसेंबरला येरवडा कारागृहाबाहेर आला होता.
राऊतची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. राऊतने भिलारे याच्याकडून ३ लाख रुपये घेतल्याचे कबूल केले आहे. पनवेल येथील डान्सबारमध्ये रक्कम उडविली असल्याची त्याने माहिती दिली आहे.
४भिलारे याच्या कोणकोणत्या नातेवाइकांनी व मित्रांनी मदत केली आहे. न्यायालयात वरिष्ठ लिपीक म्हणून कामाला असताना त्याने मोठ्या स्वरूपात रक्कम घेऊन न्यायालयाचे बनावट जामीन आदेश तयार केले. याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची सरकारी वकील रजनी तहसीलदार यांनी विनंती केली, ती न्यायालयाने मान्य केली.