पुणे : शनिवारी शहरातील काही भागांमध्ये हजेरी लावल्यानंतर आज पुण्यातील उपनगरांमध्ये पावसाने जाेरदार हजेरी लावली. पुण्यातील धायरी, वाघाेली, वडगावशेरी तसेच काेथरुडच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
जूनच्या सुरुवातील मान्सून पूर्व सरींनी हजेरी लावल्यानंतर गेले काही दिवस पावसाने पुण्याकडे पाठ फिरवली हाेती. शनिवारी काहीवेळ शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज उपनगरांमध्ये पावसाच्या जाेरदार सरी काेसळल्या. दरवर्षी जूनच्या सात- आठ तारखेपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने यंदा मात्र दडी दिली. जून महिन्यात देखील पुण्याच्या वातावरणात कमालीची वाढ झाली हाेती. गेल्या काही दिवसांपासून शहरात जरी ढगाळ हवामान असले तरी पाऊस पडत नव्हता. त्यामुळे मान्सूनची पुणेकर देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाने हजेरी लावली नसल्याने धरणांमधील पाण्याची पातळी कमालिची खालावली आहे. अवघ्या 1 ते 1.50 टिमसी उपयुक्त साठा प्रत्येक धरणांमध्ये राहीला आहे. त्यामुळे मान्सून सकारात्मक न झाल्यास पुणेकरांवर पाणी कपातीची कुऱ्हाड काेसळणार आहे.