अधिकाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:13 AM2021-09-12T04:13:34+5:302021-09-12T04:13:34+5:30
बारामती: कोरोनासारखी महामारी असतानाही निर-निमगावसाठी सर्वाधिक निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे. गावच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ...
बारामती: कोरोनासारखी महामारी असतानाही निर-निमगावसाठी सर्वाधिक निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे. गावच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना आणण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी दिली.
निर-निमगाव येथे मंजूर केलेल्या ग्रामपंचायत कार्यालय, नवीन अंगणवाडी इमारत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संरक्षण भिंत बांधकाम असे एकूण २६ लाख ५० हजार रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्माच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील यांच्या हस्ते शनिवारी ( दि. ११) करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी पंचायत समितीचे सदस्य प्रदीप जगदाळे, सरपंच प्रताप पाटील, ज्ञानदेव वावरे, काशिनाथ पवार, दीपक फडतरे, ज्ञानदेव महानवर, भगवान वावरे, रघुनाथ पाटील, उत्तम कोरे, गौतम गायकवाड, रणजीत साळुंखे, सागर सवासे, विकास भोसले उपस्थित होते.
निर-निमगाव नूतन ग्रामपंचायत कार्यालयसाठी १५ लाख रुपये, नवीन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी ८.५ लाख रुपये व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संरक्षण भिंत बांधकामसाठी ३ लक्ष रुपये जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झाले आहे. यापूर्वी अंकिता पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १० लाख रुपये निधीतून निर-निमगाव गावठाणातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण केले आहे. तसेच एक हायमस्ट दिवा बसवला आहे.
अंगणवाडी इमारत व शाळा संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन अंकिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
११०९२०२१-बारामती-०२