प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग

By admin | Published: July 27, 2016 03:57 AM2016-07-27T03:57:10+5:302016-07-27T03:57:10+5:30

इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत अद्याप कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जादा वर्ग

More classes for non-admissible students | प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग

प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग

Next

पुणे : इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत अद्याप कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जादा वर्ग
घेण्यात येणार आहे. हे वर्ग दि. २७ जुलै ते १३ आॅगस्ट या कालावधीत सहा महाविद्यालयांमध्ये होणार
आहेत. विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीच हे वर्ग घेतले
जाणार आहेत.
अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत पुणे व पिंपरी चिंचवड आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये ७३ हजार ८१९ विद्यार्थ्यांना प्रवेश अ‍ॅलॉट करण्यात आले. त्यापैकी ५२ हजार २४४ विद्यार्थ्यांनीच संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. उर्वरित २१ हजार विद्यार्थ्यांसह अद्याप आॅनलाइन प्रवेश अर्ज न भरलेले, लांबचे महाविद्यालय मिळालेले, शाखा बदल, माध्यम बदल अशा तक्रारी असणारे हजारो विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. अकरावीचे वर्ग काही दिवसांपूर्वीच सुरू झालेले असल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. हे विचारात
घेऊन प्रवेश समितीने संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जादा वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सहा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे जादा वर्ग घेतले जाणार आहेत. दि. २७ जुलै ते १३ आॅगस्ट यादरम्यान विज्ञान व वाणिज्य शाखेचे वर्ग प्रत्येकी तीन महाविद्यालयांतील होतील. याबाबत संबंधित महाविद्यालयांना संबंधित विषयाचे शिक्षक, वर्गखोल्या व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून
द्याव्यात. तसेच वर्गांचे वेळापत्रक तयार करावे, अशा सूचना विभागीय शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी संबंधित महाविद्यालयांना दिल्या आहेत.(प्रतिनिधी)

कला शाखेला वगळले
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीने जागा वर्ग घेण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यातून कला शाखा वगळण्यात आली आहे. केवळ विज्ञान व वाणिज्य शाखेचे वर्गच घेतले जाणार आहेत. याविषयी बोलताना दिनकर टेमकर म्हणाले, प्रवेशापासून वंचित राहिलेले बहुतेक विद्यार्थी विज्ञान व वाणिज्य शाखेचे आहेत. तसेच या शाखांचा अभ्यासक्रम तांत्रिक असतो. कला शाखेचा अभ्यासक्रम पुर्ण करण्यात फारशी अडचण येणार नाही. त्यामुळे कला शाखा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

जादा वर्ग होणारी महाविद्यालये
महाविद्यालयशाखा
सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणेविज्ञान
मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, पुणेवाणिज्य
एस. एम. जोशी कनिष्ठ महाविद्यालय, हडपसरविज्ञान
साधना कनिष्ठ महाविद्यालय, हडपसरवाणिज्य
श्री म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डीविज्ञान
जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय, पिंपरी वाणिज्य

Web Title: More classes for non-admissible students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.