दुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 07:57 PM2018-06-25T19:57:44+5:302018-06-25T20:01:53+5:30
पहिल्या मुलीने प्रेमविवाह केल्याने दुसऱ्या मुलीसाेबत काेणी प्रेमविवाह करु नये या हेतून सासूने जावयाला ठार करण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे.
पुणे : पहिल्या मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने दुसऱ्या मुलीसाेबत प्रेमविवाह करण्याची काेणाची हिम्मत हाेऊ नये या हेतून जावयाला जीवे मारण्याची सुपारी सासूने दिल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. याप्रकरणी पाेलीसांनी अाराेपींना अटक केली असून पुढील तपास हडपसर पाेलीस करीत अाहेत.
याप्रकरणी शैलेश कांबळे (वय 20, रा. काशेवाडी भवानी पेठ), चिक्या उर्फ कुलदिप हनुमंत तुपे (वय 21) , कृष्णा बाळुगाेविंद राठाेड (वय 19), पवण विकास अाेव्हाळ (वय 18, सर्व रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात अाले अाहे. देवई अरुण बागवे ( रा. काशेवाडी भवानी पेठ ) हीच्या पहिल्या मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग तिच्या मनात हाेता. अापल्या दुसऱ्या मुलीसाेबत प्रेमविवाह करण्याची काेणाची हिम्मत हाेऊ नये यासाठी देवई हिने तिचा भाचा शैलेश कांबळे याला जावयाला मारण्यासाठी काेणी मुले अाहेत का हे पाहण्यासाठी सांगितले. त्यानंतर शैलेश याने त्याच्या अाेळखीच्या कुलदीप तुपे याची देवई हिच्याशी बाेलणी करुन दिली. यावेळी कुलदीप याने देवई हिचा जावई सनी यादव याला मारण्यासाठी 1 लाख रुपयांची सुपारी घेतली. त्यासाठी 20 हजार रुपये अॅडव्हाॅन्स म्हणून घेतले. त्यानंतर 17 जून राेजी कुलदीप अाणि त्याचे मित्र पापा उर्फ कृष्णा, पवन अाेव्हाळ, चंदन राठाेड, प्रशांत साळवे व प्रशांतचे चार मित्र यांच्यासह हडपसर येथील ससाणेनगर येथे सनी यादव काम करत असलेल्या स्नॅक्स सेंटरवर गेले. तेथे जाऊन त्यांनी सनीवर काेयत्याने वार केले.
रविवारी 24 जून राेजी भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव माेहिते व कर्मचारी पेट्राेलिंग करत असताना पाेलीस कर्मचारी अमाेल पवार यांना अाराेपी हे कात्रज तळ्यावर अाले असल्याचे समजले. तेव्हा तपास पथकाने घटनास्थळी जाऊन अाराेपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चाैकशीत हा धक्कादायक प्रकार समाेर अाला.