MPSC Exam| संयुक्त पूर्व परीक्षेतील आणखी १७० मुलांना संधी; इतरांना मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 04:14 PM2022-01-27T16:14:27+5:302022-01-27T16:23:51+5:30

आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे...

mpsc exam opportunity for another 170 students in the combine exam | MPSC Exam| संयुक्त पूर्व परीक्षेतील आणखी १७० मुलांना संधी; इतरांना मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणार ?

MPSC Exam| संयुक्त पूर्व परीक्षेतील आणखी १७० मुलांना संधी; इतरांना मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणार ?

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) चुकीच्या कारभारामुळे राज्यातील जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. याविरोधात उच्च न्यायालयात गेलेल्या ८६ विद्यार्थ्यांना संयुक्त पूर्व परीक्षेतील मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले. त्यामुळे इतर चार ते पाच  हजार विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद  आणि नागपूर खंडपीठात गुरूवारी सुनावणी सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आणखी १६१ विद्यार्थ्यांना तर नागपूर खंडपीठाने ९ विद्यार्थ्यांना पात्र केले आहे. तर औरंगाबाद खंडपीठाचा निकाल येण्यास अद्याप वेळ आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अन्याया विरोधात युवासेना तसेच राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी आवाज उठवत मुंबई उच्च न्यायालय तसेच औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. 

... तर समान न्यायाच्या तत्वाचे उल्लंघन होऊ शकते
८६ मुलांना विशेष न्याय देऊन संविधानातील समान न्यायाच्या तत्वाचे उल्लंघन होऊ शकते याची जाणीव असायला हवीच. त्यामुळे या ८६ उमेदवारांच्या याचिकेला प्रातिनिधिक स्वरूपाचे समजून आयोगाने सर्वांना न्याय देऊन संविधानाच्या समान संधी व न्यायाच्या तत्वाचे पालन करून या तरुणांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची संधी द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव तसेच आयोगाच्या सचिवांकडे युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कामाचा फटका राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसला  आहे. आयोगाने चौथी उत्तरतालिका जाहीर करावी. त्यामुळे पूर्ण निकाल बदलणार आहे.  अन्यथा पात्र असूनही हजारोंना याचा फटका बसणा आहे. याचा आयोगाने विचार करावा.
- हनुमंत हिरवे, पात्र विद्यार्थी

संयुक्त पूर्व परीक्षेतील विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा असेल तर आयोगाने चौथी उत्तरतालिका जाहीर करावी. कारण आधीच्या तीन उत्तरतालिकेत बरोबर प्रश्नाला चुकीचे आणि चुकीच्या  प्रश्नांना बरोबर असा घोळ घातला आहे. त्यामुळे चौथी बरोबर उत्तरतालिका जाहीर करावी. त्यामधून पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. 
- सौरभ कोरडे, पात्रतेच्या प्रतिक्षेतील विद्यार्थी

आज मुबंई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठात याचिकेवर सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत मुंबई आणि नागपूरमधून एकूण १७० आणखी विद्यार्थ्यांना न्यायालयाने पात्र ठरवले आहे. संयुक्त परीक्षेती या विद्यार्थ्यांची २९ आणि ३० जानेवारी रोजी मुख्य परीक्षा होणार आहे. मात्र, दोन दिवसांत कोणत्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास होणार नाही. त्यामुळे आयोगाने परीक्षेची तारीख पुढे ढकलावी. तसेच चौथी उत्तरतालिका जाहीर करावी. तरच यातून हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. 
- तुकाराम हिरवे, पात्रतेच्या प्रतिक्षेतील विद्यार्थी

Web Title: mpsc exam opportunity for another 170 students in the combine exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.