Salman Khan Threat Case: सलमानला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचं पुणे कनेक्शन! मुंबई क्राइम ब्रांच पोहोचली पुण्यात, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 06:37 PM2022-06-09T18:37:31+5:302022-06-09T18:41:31+5:30

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणी तपास करणारं मुंबई क्राइम ब्रांचचं पथक आज पुण्यात पोहोचलं आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सौरभ कांबळे उर्फ महाकाळ याची चौकशी केली जाणार आहे.

mumbai police reached pune to interrogate saurabh mahakal in matter related to salman khan threat letter | Salman Khan Threat Case: सलमानला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचं पुणे कनेक्शन! मुंबई क्राइम ब्रांच पोहोचली पुण्यात, कारण...

Salman Khan Threat Case: सलमानला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचं पुणे कनेक्शन! मुंबई क्राइम ब्रांच पोहोचली पुण्यात, कारण...

googlenewsNext

पुणे-

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणी तपास करणारं मुंबई क्राइम ब्रांचचं पथक आज पुण्यात पोहोचलं आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सौरभ कांबळे उर्फ महाकाळ याची चौकशी केली जाणार आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात सलमान खान याला आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या पत्रासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई क्राइम ब्रांचचे वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी सौरव महाकाळची चौकशी करण्यासाठी पुण्यात पोहोचले आहेत. 

सलमान खानला धमकी देण्यात लॉरेन्स बिश्नोईचा हात? दिल्ली पोलिसांसमोर गँगस्टर म्हणाला...

पुणे पोलिसांनी बुधवारी पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात सौरव महाकाळ याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला प्रकरणात महाकाळ याचा हात आहे. सिद्ध मुसेवालाच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव समोर आलं. याच लॉरेन्स बिश्नोईनं २०१८ साली सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचं प्रकरण ताज असतानाच सलमान खान यालाही जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र प्राप्त झालं. त्यामुळे सौरव महाकाळकडून काही माहिती मिळते का यासाठी मुंबई क्राइम ब्रांच प्रयत्न करत आहे. 

कुणी धमकी दिली, तुझे शत्रू कोण?; सलमाननं पोलिसांना दिलेल्या जबाबात नेमकं काय म्हटलं वाचा...

सलमान खानला आलेल्या धमकीच्या प्रकरणात सौरव महाकाळची चौकशी सुरू आहे अशी माहिती मुंबई पोलीस क्राइम ब्रांचचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली. सौरव महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांनी काल अटक केली असून २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सौरव याला गेल्याच वर्षी ओंकार बांखुळे हत्या प्रकरणात देखील अटक केली होती. 

मुंबई पोलिसांनी २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले
सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र सलमानच्या सुरक्षारक्षकाला मिळालं होतं. ज्या ठिकाणी सलमान मॉर्निंग वॉकला जातो त्याच ठिकाणी पत्र आढळून आलं होतं. संबंधित ठिकाणी ते पत्र नेमकं कुणी ठेवलं यासाठी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. सलमान प्रकरणात मुंबई पोलीस आणि क्राइम ब्रांचसह एकूण १० टीम काम करत आहेत. 

Web Title: mumbai police reached pune to interrogate saurabh mahakal in matter related to salman khan threat letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.