पुणे : म्हात्रे पूल ते राजाराम पूल यादरम्यानच्या नदी पात्रालगतच्या मंगल कार्यालयांंवर पुणे महापालिकेच्या बाधंकाम आणि अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईपूर्वीच काही मंगल कार्यालयांनी लग्न सोहळा असताना देखील अनाधिकृत शेड काढण्यास स्वतः सुरुवात केली आहे.
म्हात्रे पूल ते राजाराम पूल नदी काठच्या भागात मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल आदी व्यवसाय सुरु झाले आहेत. त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी. बांधकाम नियमावलीत बदल करण्यासाठी नगर विकास विभागाकडे प्रस्ताव पाठवला असला तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे महापालिकेकडे मिळकतकर भरूनही जागा मालकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यानच्या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेने डिपी रस्त्यावरील मंगल कार्यालयावर पालिकेने कारवाई सुरू केली.या कारवाईपुर्वीच काही मंगल कार्यालयांनी लग्न सोहळा असताना देखील अनाधिकृत शेड काढण्यास स्वतः सुरवात केली आहे असे पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी बिपिन शिंदे यांनी सांगितले. ५०० पेक्षा जास्त विवाह सोहळे होणार होते...
डीपी रस्त्यावर अनेक मंगल कार्यालये आहेत. विवाह सोहळ्यांसाठी नागरिकांनी पैसे भरून बुकींग केलेले आहे. डीपी रस्त्यावर पुणे महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाईसाठी गेले. त्यावेळी एका मंगल कार्यालयात विवाह सोहळा होता. पण पालिका कारवाई करणार यामुळे संबंधित कार्यालयाने स्वतःहून अनाधिकृत शेड काढण्यास सुरवात केली. या कारवाईमुळे अनेकांचे विवाह अवघ्या एक दोन आठवड्यांवर आलेले आहेत असे असताना महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे जागा मालक आणि लग्न सोहळ्यासाठी बुकिंग केलेल्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.