अर्ध्याच शहराच्या ‘स्वच्छ हवे’साठी महापालिकेचा अमेरिकेत गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 09:37 PM2018-09-12T21:37:18+5:302018-09-12T21:46:00+5:30

पुणे महापालिकेला क्लायमेंट चेंज अ‍ॅण्ड क्लीन एअर अ‍ॅवार्ड देऊन संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने अमेरिकेत गौरव केला आहे. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टिका विरोधी पक्षांनी केली आहे.

Municipal Corporation's 'prize' in the United States for 'Clean Air' for half city | अर्ध्याच शहराच्या ‘स्वच्छ हवे’साठी महापालिकेचा अमेरिकेत गौरव

अर्ध्याच शहराच्या ‘स्वच्छ हवे’साठी महापालिकेचा अमेरिकेत गौरव

Next
ठळक मुद्देविरोधकांची टिका: पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या हा प्रकार देशात दिल्लीनंतर पुणे शहरात सर्वांधिक प्रदुषण असल्याचे अनेक अहवालात स्पष्ट

पुणे: देशात दिल्लीनंतर पुणे शहरात सर्वांधिक प्रदुषण असल्याचे अनेक अहवालात स्पष्ट केले आहे. पुणे महापालिकेच्या सन २०१८ च्या पर्यावरण अहवालात प्रदुषणामध्ये वाढ होत असल्याचे म्हटले आहे.तरीही पुणे महापालिकेला क्लायमेंट चेंज अ‍ॅण्ड क्लीन एअर अ‍ॅवार्ड देऊन संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने अमेरिकेत गौरव केला आहे. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टिका विरोधी पक्षांनी केली आहे. 
 विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, युनायटेड नेशन इन्व्हॉरमेन्ट प्रोग्रॅमने पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्लायमेंट चेंज अ‍ॅण्ड क्लीन एअर अ‍ॅवार्ड २०१८  पुरस्कार दिला आहे. महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, अधिकारी सुरेश जगताप यांनी हा पुरस्कार अमेरिकेत जाऊन हा पुरस्कार स्विकारला. तुपे म्हणाले, शहरात हवा आणि ध्वनी प्रदुषण मोठया प्रमाणात आहे. शहरात कच-याची समस्या आहे. या स्थितीमध्ये अमेरिकेतील पुरस्कार मिळतो.  
शहरात कचरा कोंडी झाली असताना शहर सोडुन परदेश दौ-यावर गेलेल्या नेत्यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे. उरुळी देवाची आणि 
फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पालिकेच्या कचरा गाडया २३ दिवस आडवुन कचरा कोंडी केली होती. त्यावेळी महापौर परदेश दौ-यावर होत्या. आता कचरा कोंडी असताना शहर सोडुन गेलेले पुरस्कार घेतात अशी टिका काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. 

Web Title: Municipal Corporation's 'prize' in the United States for 'Clean Air' for half city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.