पालिका निवडणुका एकत्र लढणार : संजय राऊतांनी दिले संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:21 AM2021-02-21T04:21:33+5:302021-02-21T04:21:33+5:30
पुण्यामध्ये शनिवारी (दि.२०) राऊत यांनी शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. राऊत म्हणाले, "महापालिका निवडणुकीत जास्त व ...
पुण्यामध्ये शनिवारी (दि.२०) राऊत यांनी शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते.
राऊत म्हणाले, "महापालिका निवडणुकीत जास्त व ती मान्य करून त्यांनी पक्ष जागा वाटप करून एकत्रित निवडणुका कशा लढवल्या जातील, याचा विचार करू,"
पदवीधर निवडणुकांच्या वेळी तीनही पक्ष एकत्रित लढल्याने भाजपला फटका बसू शकतो, सिद्ध झाले आहे. त्यामुळे वर्षभरावर आलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये हे पक्ष एकत्रित लढणार का, याबाबत चर्चा सुरू होती. आता राऊत यांनी एकत्र राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
विरोधकांनी धार्मिक राजकारण करत मंदिरे उघडायला लावली. आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत त्यांना विचारले असता देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपला संवाद आहेच. त्यांची मुलाखत होणार आहे, पण पेपर न होता थेट रिझल्टच बघायला मिळेल, असं राऊत म्हणाले.
---------------------------------
...तर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली लढू
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जिथे ज्या पक्षाची ताकद आहे, तिथे त्यांच्या नेतृत्वाखाली लढू. उदाहरण द्यायचं, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल, असे राऊत यांनी सांगितले.