राहुल गायकवाड
पुणे : साेन्याच्या दुकानात काम करत असताना अापला संसार सुखाचा व्हावा याची स्वप्न ती बघत हाेती. लग्न ठरल्याच्या अानंदाबराेबरच जबाबदारीची जाणीव सुद्धा तिला झाली हाेती. नेहमीप्रमाणे सकाळी कामावर ती गेली. अकाऊंट विभागात काम करत असल्याने अाकड्यांमध्ये ती हरवून गेली असतानाच एक फाेन अाला अन अायुष्याचं गणितच बदललं...अवघ्या काही मिनिटात घराचं हाेत्याचं नव्हंत झालं. ही कहाणी अाहे मुठा कालवा फुटल्याने घर उजाड झालेल्या स्वप्ना लाेंढेची
अाज सकाळी 11.30 च्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील मुठा कालवा दांडेकर पुलाजवळ फुटला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लाखाे लिटर पाणी रस्त्यावर अालं. काही मिनिटातच सिंहगड रस्ता गुडघाभर पाण्याने भरुन गेला. सिंहगड रस्त्याच्या बाजूला असलेल्या दांडेकर पूल वसाहतीत कालव्याचे पाणी शिरले. क्षणार्धात हाेत्याचं नव्हतं झालं. या ठिकाणी झाेपडपट्टी असल्याने चिंचाेळ्या बाेळ अाहेत. बहुतेक बैठी घरं असल्याने घरांमध्ये वेगाने पाणी शिरले. घरातील पुरुष मंडळी कामावर गेली असल्याने बहुतकरुन महिलाच घरी हाेत्या. अचानक पाणी शिरल्याने अाता करायचे काय हेच त्यांना उमगत नव्हते. येथे राहणारी स्वप्ना अाणि तिची अाई दाेघीही कामावर गेल्या हाेत्या. तिची अाई घरकाम करते. स्वप्ना कामात गुंतलेली असतानाच तिला घरात पाणी शिरल्याचे कळाले. हातातलं काम टाकून तिने घराकडे धाव घेतली. घरी येऊन पाहते तर तिच्या पायाखालची जमिनच सरकली. घराची मागील बाजूची भिंत काेसळून घरातील सामान घरामागील नाल्यात पडले हाेते. नव्या संसाराची स्वप्न डाेळ्यात साठवत असताना उजाड घर पाहून तिचे डाेळे पाणावले हाेते.
स्वप्ना सारखीच परिस्थीती अनेकांची हाेती. वयस्कर नागरिकांना काही तरुणांनी घराचे पत्रे उचकटून बाहेर काढले. सगळीकडे राडाराेडा पडला हाेता. जाे ताे घरातलं काय वाचलय का याचा शाेध घेत हाेता. दुचाकींमध्ये पाणी भरल्याने त्या नादुरुस्त झाल्या हाेत्या. प्रत्येकजण अाता करायचे काय या प्रश्नात हरवून गेला हाेता. अनेकांचे अख्खे संसारच वाहून गेल्याने डाेक्याला हात लावून बसण्यापेक्षा त्यांच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता.