नांदेमध्ये प्रशांत रानवडे यांच्या श्री भैरवनाथ विकास पॅनेलचेच वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:13 AM2021-01-20T04:13:45+5:302021-01-20T04:13:45+5:30
श्री भैरवनाथ विकास पॅनेलने या निवडणुकीमध्ये प्रचारात शेवटपर्यंत आघाडी घेतली होती आणि त्याला त्यापध्दतीने यश देखील मिळाले आहे. त्यांच्या ...
श्री भैरवनाथ विकास पॅनेलने या निवडणुकीमध्ये प्रचारात शेवटपर्यंत आघाडी घेतली होती आणि त्याला त्यापध्दतीने यश देखील मिळाले आहे. त्यांच्या पॅनलमध्ये वार्ड क्रमांक १ मधून गुलाब चिंतामण ढमाले, हेमलता निखिल रानवडे, निकिता शेखर रानवडे हे निवडून आले. वार्ड क्र.३ मधून सुनील सखाराम जाधव,आरती विठ्ठल रानवडे,संघमित्रा अजित ओव्हाळ (बिनविरोध निवड) हे उमेदवार निवडून आले आहेत.
श्री भैरवनाथ विकास पॅनेलसाठी वार्ड क्रमांक २ मध्ये मात्र सगळ्यात जास्त संघर्ष होता, त्याला कारणही तसेच होते. नांदे गावचे माजी सरपंच प्रशांत रानवडे यांच्या पत्नी पायल रानवडे यांच्यासह इतर दोन्ही उमेदवार या पॅनलमध्ये उभे होते. तेव्हा दुर्दैवाने या तिन्ही उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले व त्या ठिकाणी अनिकेत रानवडे, सयाजी रानवडे व प्रिती करंजावणे हे तीन उमेदवार निवडून आले.
--
रानवडे घराण्यातील पहिला पराभव
भैरवनाथ विकास पॅनेलचा ९ पैकी ६ जागा जिंकत मोठे यश संपादन केले असून मात्र दोन नंबर वार्ड मध्ये प्रशांत रानवडे यांच्या पत्नी पायल रानवडे यांचा पराभव झाला असून त्यांच्या या पराभवामुळे नांदे ग्रामपंचायत स्थापनेनंतरचा म्हणजेच १९६५ पासूनचा प्रशांत रानवडे यांच्या घराण्यातील हा पहिलाच पराभव असून, त्यांच्यासह इतर दोन उमेदवारांचा पराभव झाल्यामुळे 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था भैरवनाथ विकास पॅनलची झालेली आहे.
--
फोटो क्रमांक : १९पिरंगुट
फोटो ओळ : नांदे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार मान्यवर व ग्रामस्थ आनंदोत्सव साजरा करतानाचा क्षण