नारायणगावला मिळणार शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:10 AM2020-12-08T04:10:42+5:302020-12-08T04:10:42+5:30
नारायणगाव : नारायणगाव शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि शुद्ध नळ पाणीपुरवठा साठी पेयजल योजने ...
नारायणगाव : नारायणगाव शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि शुद्ध नळ पाणीपुरवठा साठी पेयजल योजने अंतर्गत या योजनेसाठी २२ कोटी मजूर झाले आहेत , पुढील वर्षी हा प्रकल्प सुरु होईल , अशी माहिती लोकनियुक्त्त सरपंच योगेश पाटे यांनी दिली आहे.
ग्रामपंचातीच्या ग्रामविकास निधीतून करण्यात आलेल्या वॉर्ड क्र ४ मधील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उदघाटन सरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते करण्यात आले . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक गांधी ,ग्रामपंचायत सदस्य संतोष दांगट ,आरिफ आतार ,राजेश बाप्ते ,संतोष पाटे ,शरद धोंगडे ,सुदीप कसाबे ,अग्नेल परेरा,जालू खैरे ,दीपक कुलकर्णी ,संदेश बोऱ्हाडे ,देविदास ताजवे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने योगेश पाटे यांना आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.
योगेश पाटे म्हणाले की , गावातील सर्व रस्ते हे दर्जेदार होणार आहेत . शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून पहिल्या टप्यात नेवकर पुला पर्यंत काम झाले आहे , दुसऱ्या टप्प्यात मीना नदी पुलापर्यंत काम सुरु होणार आहे. त्यानंतर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु होईल . नारायणगाव शहरातील पिण्याच्या पाणी नळ पाणीपुरवठा साठी पेयजल योजनेअंतर्गत २२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे .येत्या वर्षभरात या योजनेचे काम सुरु होईल . कोरोनाच्या काळात विकासकामे करताना बंधने असल्याने कामे सुरु करता आली नाही . काही विरोधकांनी रस्त्यांचे राजकरण केले होते . पण कोरोनाची परिस्थिती बदल्याने विकासकामे हि टप्प्याटप्याने केली जाणार आहेत .
अशोक गांधी म्हणाले की, ग्रामचायतीने केलेला हा स्मार्ट रस्ता आहे. सरपंच योगेश पाटे यांनी ग्रामपंचातीच्या माध्यमातून गुणवत्ता व चांगल्या प्रतीचा हा रस्ता केला आहे . पाटे यांनी कोरोना काळात केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
फोटो - ग्रामपंचातीच्या ग्रामविकास निधीतील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उदघाटन व लोकाअर्पण सोहळा सरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते करण्यात आले .
--
Thanks & Regards Sachin Kankariya Narayangaon 9422078780