पुणेकर जागवणार काश्मीरमध्ये राष्ट्रीय अस्मिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 03:03 AM2019-02-22T03:03:30+5:302019-02-22T03:04:35+5:30
सृजन कॉलेज आॅफ डिझाइन आणि आम्ही पुणेकरचा उपक्रम
पुणे : सृजन कॉलेज आॅफ डिझाइन, आम्ही पुणेकर, जिल्हा परिषद, रियासी-जम्मू आणि जनरल जोरावर सिंग शैक्षणिक आणि चॅरिटेबल ट्रस्ट जम्मू कश्मीर यांच्या संयुक्त पुढाकारातून काश्मीरच्या इतिहासातील शूर योद्धा जनरल जोरावर सिंग यांच्या जीवनावर थ्रीडी लघुपट बनविण्यात येत असून, त्याच्या पोस्टरचे प्रकाशन जम्मू येथील रियासी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात झाले.
सृजन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी प्रत्यक्ष जम्मू कश्मीरला भेट दिली असून, तेथील इतिहासकार, ऐतिहासिक वास्तू यांना भेटी दिल्या आहेत. एक फार मोठा विषय हाताळण्याची संधी आम्हाला मिळत असून, एक उत्तम निर्मिती करून दाखविण्याचे आमचे ध्येय असल्याची प्रतिक्रिया सृजनमधील विद्यार्थी केशर कुंभवडेकर, सायली खेडेकर, पूजा कोळेकर, आदित्य घोडके, रविराज वायदंडे, उत्कर्ष जाधव, स्वप्नील गोपाळे, संकेत मांगले, मानसी जगताप, तुषार पाटील आदी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सृजन कॉलेजचे कार्यकारी संचालक संतोष रासकर, अश्विनी शिंदे, अमर साखरे, अनुराग त्यागी, सौरभ गुंजाळ हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमामुळे पुणे-जम्मू काश्मीर या नात्याला दृढता मिळणार असल्याची प्रतिक्रिया आम्ही पुणेकर या संस्थेचे सचिव हेमंत जाधव यांनी व्यक्त केली.
जम्मू काश्मीर मधील रियासी जिल्हाचे जिल्हा अधिकारी सागर डोईफोडे म्हणाले की, या उपक्रमामुळे जम्मू काश्मीरच्या इतिहासाला पुर्नजीवन मिळणार आहे.