पुणे : ज्या मनुस्मृतीच्या आधारे सत्ताधारी देशात अराजकता पसरवत आहेत. गरीब शेतक-यांना नाडत आहेत. देशातील वातावरण दुषित करीत आहेत. त्यांना योग्य समज देण्याकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने मनस्मृती बरोबरच इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन केले. इव्हीएम मशीनच्या घोटाळ्यामुळे सत्ताधारी पक्षाला बळ मिळत असून त्यांची एकाधिकारशाहीच्या विरोधात घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
गणेश कला क्रीडा येथे झालेल्या या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार दिलीप वळसे पाटील, फौजिया खान, आमदार विद्या चव्हाण, राजलक्ष्मी भोसले, रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ’’लोगो की मांग स्वीकार करो इव्हीएम बंद करो, बंद करो’’ , संविधान के सन्मान में राष्ट्रवादी मैदान में, संविधान बचाव देश बचाव, इव्हीएम बचाव देश बचाव, मनुस्मृती हाय हाय, मनुस्मृतीचे दहन झालेच पाहिजे, मनुस्मृती मुर्दाबाद.... अशा प्रकारच्या घोषणा कार्यकर्त्यांनी देवून आपला निषेध व्यक्त केला. मागील काही दिवसांपासून देशात अराजकता व सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असताना राज्यसरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. गोरगरिब शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांच्याप्रती उदासीन असणा-या सरकारला जाग आणण्याकरिता मनस्मृती व इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. याबरोबरच येत्या निवडणूकांमध्ये इव्हीएम मशीनऐवजी बँलट पेपरचा वापर केला जावा. अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.