चंदननगर : प्रभाग ४मध्ये राष्ट्रवादीचे भैया जाधव यांना १४,०२८ मते मिळाली. भाजपाचे शैलजित बनसोडे यांना १२,११९ मते मिळाली. शिवसेनेचे सुनील थोरात यांना ६,३७३ मते मिळाली. अपक्ष सुरेश आल्हाट यांना १,२८५ मते मिळाली. या ठिकाणी नोटाचा वापर ८३१ जणांनी केला. एकूण ३६,१५२ मतदान झाले. राष्ट्रवादीचे भैय्या जाधव हे १,९०९ मतांनी विजयी झाले.ब गटातून राष्ट्रवादीच्या सुमन पठारे यांना १७,३४९ मते मिळाली. भाजपाच्या बबडाबाई पठारे यांना १०,९८० मते मिळाली. शिवसेनेच्या मीनाक्षी शेजवळ यांना ६,१३० मते मिळाली. अपक्ष नम्रता पवार यांना ७७७ मते मिळाली. येथे नोटाचा वापर ९१६ जणांनी केला. राष्ट्रवादीच्या सुमन पठारे या ६,३६९ मतांनी विजयी झाल्या.क गटातून राष्ट्रवादीच्या संजिला पठारे यांना १७,१२५ मते मिळाली. भाजपाच्या सोनल चव्हाण यांना ११,०१७ मते मिळाली. शिवसेनेच्या संध्या पठारे यांना ५,८३२ मते मिळाली. मनसेच्या ऊर्मिला बनकर यांना १,०३७ मते मिळाली. अपक्ष तेजश्री पठारे यांना ४९२ मते मिळाली. येथे नोटाचा वापर ६४९ जणांनी केला. राष्ट्रवादीच्या संजिला पठारे यांचा ६,१०८ मतांनी विजय झाला. ड गटातून राष्ट्रवादीच्या महेंद्र पठारे यांना १४,८९५ मते मिळाली. भाजपाचे सचिन सातपुते यांना ११,०६९ मते मिळाली. शिवसेनेचे संतोष भरणे यांना ९,५९३ मते मिळाली. येथे नोटाचा ५९५ जणांनी वापर केला. (वार्ताहर)
खराडी प्रभाग ४मध्ये राष्ट्रवादी विजयी
By admin | Published: February 24, 2017 3:23 AM