ब्रँड निर्माण कारण्यासाठी जिद्द, चिकाटी हवी : उद्योजकांचे मत; ‘ब्रँडनामा’चे पुण्यात प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 06:09 PM2017-12-04T18:09:04+5:302017-12-04T18:17:45+5:30
रसिक आंतरभारती आणि प्रतिसाद कम्युनिकेशन्स यांच्या वतीने अभिजित जोग लिखित ‘ब्रँडनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेता सचिन खेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे आणि ई-आवृत्तीचे प्रकाशन झाले.
पुणे : मराठी माणूस उद्योगविश्वात मोठा झाला आहे. परंतु, स्वत: चा ब्रँड निर्माण करू न शकल्याने आपला प्रभाव पाडू शकलेला नाही, उद्योग, व्यवसाय कुणीही निर्माण करू शकतो. मात्र, ब्रँड निर्माण कारण्यासाठी जिद्द, चिकाटी याबरोबरच हुशारी आवश्यक असते, अशी भावना उद्योजकांनी व्यक्त केली.
रसिक आंतरभारती आणि प्रतिसाद कम्युनिकेशन्स यांच्या वतीने अभिजित जोग लिखित ‘ब्रँडनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेता सचिन खेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे आणि ई -आवृत्तीचे प्रकाशन झाले. याप्रसंगी गौतम ठाकूर, शशांक परांजपे, श्रीकृष्ण चितळे आणि सौरभ गाडगीळ या चार उद्योजकांशी संवाद साधण्यात आला. या उद्योजकांच्या यशाचे गमक चित्रपट लेखक क्षितीज पटवर्धन यांनी मुलाखतीतून उलगडले.
सचिन खेडेकर म्हणाले, ‘जाहिरातबाजीला महत्त्व न दिल्याने आपण मागे पडलो, असे नाही. मात्र प्रभाव पाडण्यात कमी पडलो असे म्हणण्यास वाव आहे.’
लेखक अभिजीत जोग यांनी ब्रँडनामा या पुस्तकामागील आपली भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिश जोग आणि योगेश नांदुरकर यांनी केले, तर शैलेश नांदुरकर यांनी आभार मानले.