एल्गार परिषद तपासाची सूत्रे ताब्यात घेण्यास एनआयए पुण्यात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 05:36 PM2020-02-17T17:36:03+5:302020-02-17T17:46:14+5:30
एनआयएचे पोलीस अधिक्षक विक्राम खलाटे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले असून त्यांनी तपासासंबंधी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
पुणे :महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये एल्गार परिषद प्रकरणाच्या चौकशीवरुन झालेल्या संघर्षाअंती हा तपास केंद्रीय तपास यंत्रणा (एनआयए)कडे गेला आहे. त्याच्याच पुढची पायरी म्हणजे एनआयएचे पोलीस अधिक्षक विक्राम खलाटे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले असून त्यांनी तपासासंबंधी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यास सहमती दर्शवली आहे. त्याच संदर्भातील कागदपत्रे आणि पुरावे ताब्यात घेण्यासाठी आता एनआयएने हालचाली सुरु केल्या आहेत. या कारणासाठी खलाटे यांनी तपास अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडून खटल्यासंबंधी माहिती घेतली आहे.