पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये फक्त नऊ हजार जणच दारू पितात, असा जावई शोध उत्पादन शुल्क विभागाने लावला आहे. गेल्या वर्षभरात या विभागाने नऊ हजार जणांना मद्यपी परवाने दिले असल्याचे सांगितले आहे. शहराची लोकसंख्या २० लाखाच्या घरात आहे. त्यातच दारुच्या दुकानासमोर होणारी गर्दी दिवसेन दिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कार्यालयाने गेल्या वर्षभरामध्ये ९ हजार नागरिकांना परवाना दिला आहे. त्यामध्ये ३६० परवाने हे लाईफटाईम आहेत. तर, १९७ परवाने एक वर्षासाठी दिले आहेत. लाईफटाईम परवान्यासाठी १ हजार रुपये शुल्क आकारले जातात. तर एक वर्षाच्या परवान्याासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाते. एक दिवसाचा परवाना काढायचा असेल, तर त्यासाठी विदेशी दारु पिण्याचा परवाना ५ रुपयांचा तर देशी दारु पिण्यासाठी २ रुपये आकारले जातात. अनेक नागरिक विनापरवाना दारू पितात. परवाना नसताना दारु पिणे हा गुन्हा ठरतो. मात्र, याकडे विभागाने हेतू पुरस्कर पणे दुर्लक्ष केले आहे. दारु पिणाऱ्या लोकांवर व रस्त्याने लोटांगण घेत असलेल्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे दिसून येते. शहरातील मद्यविक्री करणाऱ्या दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. मात्र, विशेष करुन लहान मुलेही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्याच बरोबर तरुण मुलांची गर्दी दिसते. त्यांच्याकडे दारु पिण्याचा परवाना नसतो. अनेक तरुण मुलेही दारु पिताना दिसतात. मात्र, विभागाला याचे काहीच देणेघेणे नाही. दारु पिणाऱ्या व्यक्तीवर किंवा मुलांवर कारवाई झाली. तर त्यांना चाप बसून पिण्याचे प्रमाण कमी होईल. परवाना घेण्यासाठी असणारे कागदपत्रे आणि त्यासाठी होणारा खर्च, कार्यालयाला हेलपाटे मारणे सगळ््यांनाच परवडणारे नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिणाऱ्यांची संख्या कमी होईल. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांची टाळाटाळ ४दारु पिणाऱ्या लोकांवर काय कारवाई केली जाते. असे विचारल्या नंतर उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यांच्यावर विभागाच्या वतीने वचक ठेवण्यात येत नाही. ३१ डिसेंबर च्या वेळी फक्त परवाने हॉटेल वाल्यांना वाटायचे आणि विक्री होते हे दाखवायचे या पलिकडे विभाग कारवाई करत नसल्याचे दिसून आले. मद्यपान करुन वाहन चालवले असता. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले जाते.दारू पिउन गाडी चालवणाऱ्या व्यक्तीवर मोटार वाहन कायदा १८४ व १८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. विना परवाना मद्यपान केल्यास दारु बंदी अधिनीयमा अंतर्गत कारवाई केली जाते. - राजेंद्र माने, उपायुक्त
नऊ हजार जणच पितात दारू!
By admin | Published: December 31, 2014 12:34 AM