गणेशोत्सवात भाजपा वगळता इतर राजकीय पक्षांचा अनुत्साह : नेते, कार्यकर्ते गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 09:45 PM2019-09-13T21:45:12+5:302019-09-13T21:47:00+5:30
केंद्रात, राज्यात व महापालिकेतही भाजपाचीच सत्ता असल्याचे उत्सवात ठासून सांगण्याचा उद्देश यातून स्पष्ट होत होता.
पुणे : गणेशोत्सव म्हणजे राजकीय प्रचार करण्याची संधी, मात्र यंदाच्या गणेशोत्सवात सत्ताधारी भारतीय जनता पार्टी वगळता अन्य राजकीय पक्षांचा उत्साह पुण्यात कुठेही दिसला नाही. नावापुरती हजेरी लावून काँग्रेसचे नेते निघून गेले, त्यामुळे त्यांचे कार्यकतेर्ही पक्षाचे नाव सांगण्याऐवजी मंडळाच्या नावालाच अधिक पसंती देताना दिसत होते. फ्लेक्स व बॅनरवरही भाजपाचेच वर्चस्व दिसत होते. केंद्रात, राज्यात व महापालिकेतही भाजपाचीच सत्ता असल्याचे उत्सवात ठासून सांगण्याचा उद्देश यातून स्पष्ट होत होता.
मागील वषीर्ही शहरात भाजपाचीच सत्ता होती, मात्र तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांनी उत्सवातील वावर कमी केला नव्हता. यावेळी मात्र उत्सवात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इतकेच काय पण भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचेही नेते व कार्यकतेर्ही फारसे दिसत नव्हते. मानाच्या गणपतींची मिरवणूक मंडईतून सुरू होताना काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी व काही अपवाद वगळता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणीही तिथे नव्हते. मिरवणूकीत थोडा सहभाग दाखवत गाडगीळ नंतर निघून गेले व जोशी यांनी त्याआधीच मिरवणूक सोडली होती.
पालिकेच्या टिळक चौकातील स्वागत मंडपातही दरवर्षी पालिकेतील सर्वच पक्षाचे नेते असतात. यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे, नगरसेवक गोपाळ चिंतल, गायत्री खडके असे भाजपाचेच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मंडपात होते. काँग्रेसच्या मोहन जोशी यांनी थोडा वेळ हजेरी लावली व नंतर ते निघून गेले. मंडपात त्यानंतर थेट सकाळपर्यंत फक्त भाजपाच्याच पदाधिकाºयांची येजा सुरू होती.
स्वागत मंडप तसेच शहरामधील चौकांमध्ये, मोक्याच्या ठिकाणी उत्सवकाळात अनेक बॅनर, फ्लेक्स लावले जातात. याही वर्षी ते होतेच, मात्र त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश नव्हता. भाजपाने मात्र ह्यपुन्हा देवेंद्र..च !ह्ण असे मोठ्या अक्षरात लिहिलेले अनेक फलक शहरात लावले होते. पथदिव्यांच्या खांबांवर अडकवता येतील असे फ्लेक्स तयार करून नगरसेवकांनी त्यावर पक्षाच्या नेत्यांसह स्वत:चीही छबी झळकावून घेतली होती. त्यातुलनेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय विरोधक मात्र अगदी नावालाच कुठेकुठे दिसत होते.-------------------
------
टिळक चौकातील पालिकेच्या स्वागत मंडपाच्या समोरच्या तिन्ही बाजूंच्या इमारतींवरही भाजपाचेच फ्लेक्स होते. गणेश भक्तांना शुभेच्छा देतानाच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यात राजकीय प्रचारही करून घेतल्याचे स्पष्ट दिसत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्यातही दिसत नव्हते.
-----
शिवसेना हा भाजपाचा मित्रपक्ष. एरवी गणेशोत्सव म्हणजे शिवसेनेसाठी पर्वणी असते. मात्र शहरातील सर्व म्हणजे आठही विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचे वर्चस्व आहे. महापालिकेतील सत्तेत भाजपाने शिवसेनेला डावलले आहे. लोकसभेत सहभागी करून घेतले, मात्र आता विधानसभा निवडणूकसाठी त्यांची उपेक्षा केली जात आहे. त्यामुळेच की काय शिवसेनाही उत्सवात कुठेच फारशी झळकताना दिसत नव्हती.