सिंहगडावरील रस्त्याची दुरूस्ती होईना : पीडब्ल्यूडीला सापडेना मुहुर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 04:57 PM2018-12-06T16:57:17+5:302018-12-06T17:05:23+5:30

सिंहगडला भेट देणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

no repairing of Sinhagad fort road : PWD can not be found time for opening | सिंहगडावरील रस्त्याची दुरूस्ती होईना : पीडब्ल्यूडीला सापडेना मुहुर्त

सिंहगडावरील रस्त्याची दुरूस्ती होईना : पीडब्ल्यूडीला सापडेना मुहुर्त

Next
ठळक मुद्देपर्यटकांचे होतायेत हाल, रस्ता खराब असल्याने वाहन चालवताना अनेक अडचणी सिंहगडावरील रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाबाबत प्रशासन खरच गंभीर आहे का? असा प्रश्न उपस्थित

पुणे: सिंहगड रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी)मुहुर्त सापडत नसल्याने पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यानंतर, दिवाळीनंतर रस्त्याच्या दुरूस्तीची कामे पीडब्ल्यूडीकडून सुरू केली जाणार होती.मात्र,आता डिसेंबरच्या तिस-या आठावड्यातील मुहुर्त शोधण्यात आला आहे.त्यामुळे सिंहगडावरील रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाबाबत प्रशासन खरच गंभीर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 सिंहगडला भेट देणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.त्यातच हिवाळ्यात शहरातील तरुणाईकडून सुट्टीच्या दिवशी गडावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जाते .मात्र,रस्ता खराब असल्याने वाहन चालवताना अनेक अडचणी येत आहेत. सुमारे महिन्याभरापूर्वी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी चर्चा करून दुरूस्तीचे काम सुरू करण्यात येईल आहे,असे पीडब्ल्यूडीकडून स्पष्ट करण्यात आले होते.परंतु,अजूनही रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू झालेले नाही.त्यामुळे पर्यटकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सुमारे दीड वर्षापूर्वी पावसाळ्यात सिंहगडावर दरड कोसळयामुळे काही दिवस गडावरील वाहतुक बंद ठेवण्यात आली होती. किरकोळ दुरूस्तीचे काम केल्यानंतर गडावरील वाहतुक पुन्हा सुरू करण्यात आली. सुमारे दोन वर्षांपासून गडावरील रस्त्याच्या दुरूस्तीचे काम संथ गतीने सुरू आहे.पावसाळ्यात काम करता येत नाही,असे पीडब्ल्यूडीच्या अधिका-यांकडून सांगितले जाते.परतु,यंदा पाऊस कमी झाल्याने पावसाचे कारण देता येत नाही.तसेच शाळा सुरू झाल्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांचे कारणही आता देता येणार नाही.
गडाच्या पायथ्यापासून काही किलो मिटरपर्यंतचा रस्ता चांगला आहे. मात्र,वळणावर मोठे खड्डे चुकवत वाहन चालकांना गडापर्तंत जावे लागते.गडावर दरड कोसळल्यामुळे एकदा पर्यटक अडकून पडले होते.तसेच शनिवारी,रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो.त्यामुळे गडावरील रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.त्याबाबतची निविदा व वर्क आॅर्डर आदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.त्यामुळे गडावर काही किलोमिटर सिमेंटचा पक्का रस्ता केला जाणार आहे.परंतु,कामास मुहुर्त सापडत नसल्याने रस्त्याचे काम खोळंबले आहे.
----------------------  
सार्वजनिक बांधकाम विभागाने सिंहगड रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाची तयारी पूर्ण केली आहे.पुढील चार ते पाच दिवसात कामाला सुरूवात केली जाईल.त्यामुळे दुरूस्तीच्या काळात काही दिवस गडावरील वाहतूक बंद ठेवली जाईल. 
- डी.एन.देशपांडे,कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग  

Web Title: no repairing of Sinhagad fort road : PWD can not be found time for opening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.