महिलांचा अपमान होईल असे वक्तव्य केले नाही! निवृत्ती महाराज यांचे तृप्ती देसाई यांच्या नोटिशीला उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 10:58 PM2020-07-07T22:58:24+5:302020-07-07T23:00:42+5:30
आजपर्यंत कधीही किर्तनातून महिला अपमानीत होतील किंवा त्यांचा अनादर होईल, अंधश्रद्धा पसरेल, असे वक्तव्य केलेले नाही
पुणे - माझे कोणी समर्थक नाही़ अज्ञात लोकांनी तृप्ती देसाई यांना धमकी दिली असेल तर त्याला आपण जबाबदार नाही़ आजपर्यंत कधीही किर्तनातून महिला अपमानीत होतील किंवा त्यांचा अनादर होईल, अंधश्रद्धा पसरेल, असे वक्तव्य केलेले नाही, असे निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी स्पष्ट केले आहे़
निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी जाहीर कीर्तनातून अंधश्रद्धा पसरविणारे वादग्रस्त वकतव्य केले होते. महिलांविषयी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर नेहमीच आक्षेपार्ह टिप्पणी व वकतव्ये करीत असतात व महिलांचा जाहीररित्या अपमान करीत असतात या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी अॅड़ मिलिंद दत्तात्रय पवार यांचे मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली होती़ या नोटिशीला निवृत्ती महाराज देशमुख यांनी अॅड़ डॉ़ मिलिंद साळुंखे यांच्या मार्फत या उत्तर दिले आहे. या उत्तरात देसाई यांनी केलेले आरोप इंदोरीकर महाराज यांनी फेटाळून लावले आहेत.
निवृत्ती महाराज देशमुख यांचे कोणी समर्थक नाही. निवृत्त महाराज कुठल्याही समर्थकांना ओळखत नाही, काही अज्ञात लोकांनी काही उद्योग केले असतील तर त्याला निवृत्ती महाराज जबाबदार नाही. निवृत्ती महाराज देशमुख यांनी आजपर्यंत कधीच कीर्तनातून महिलांना अपमानीत होईल किंवा महिलांचा अनादर होईल असे वकव्य किंवा अंधश्रद्धा पसरेल असे वकव्य जाहीर कीर्तनातून कधीही केलेले नाही. त्यामुळे महाराजांनी महिलांची जाहीर माफी मागावी असे निवृत्ती महाराज देशमुख यांना वाटत नाही किंवा माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही अशा आशयाचा मजकूर असलेले उत्तर अॅड मिलिंद दत्तात्रय पवार यांना निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या सहीनीशी रजिस्टर पत्राद्वारे पाठविले आहे.
देसाई यांनी इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना फोन करुन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या़ या विरोधात त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात निवृत्त महाराज देशमुख व धमकी देणाºयाविरोधात तक्रार दिली आहे़ मात्र, लॉकडाऊनमुळे ही तक्रार प्रलंबित आहे.