पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे असलेली माहिती यापुढे पूर्ण सुरक्षित असणार असून विद्यापीठाने दक्षिण भारतीतील एका प्रसिद्ध विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता भूकंप, आग किंवा कोणत्याही नैसर्गिक तसेच सायबर हॅकिंग सारख्या मानवनिर्मित आपतींपासून डेटा सुरक्षित राहणार आहे.
डिझास्टर रिकव्हरी अँड बिझनेस कंट्युनिटी असे या कराराचे नाव आहे . या करारानुसार दक्षिण भारतातील एका विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माहितीची एक प्रत डिजिटल स्वरूपात ठेवली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाचा डेटा सुरक्षित राहणार आहे. याचा परिणाम म्हणून विद्यापीठाच्या कोणत्याही कामात खंड निर्माण होणार नाही. ही सुविधा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वापरली जाते.या कराराची कालमर्यादा सध्या ५ वर्षे इतकी असून त्यानंतर दोन्ही बाजूंनी मान्यता दर्शविल्यास वाढवता येईल असे विद्यापीठ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.