पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील प्राणांतिक अपघाताची संख्येत घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांच्या तुलनेत यंदा प्राणांतिक अपघाताचे प्रमाण 21. 83 ट्क्क्यांनी कमी झाले आहे. असे असले तरी गंभीर अपघातांमध्ये या कालावधीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 1.60 टक्के इतकी वाढ झाली आहे.
शहरातील प्राणांतिक तसेच गंभीर अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी वाहतूक पाेलिसांकडून विविध उपाययाेजना राबविण्यात येत आहेत. दुचाकी चालकांचे अपघाताचे प्रमाण अधिक आहे. दुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. जानेवारी पासून शहरात हेल्मेट सक्ती जाेरदार करण्यात आली आहे. हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांना दंड करण्यात येत आहे. त्याचबराेबर सीसीटिव्हीच्या माध्यमातून देखील कारवाई करण्यात येत असल्याने नियम माेडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्राणांतिक अपघाताचे प्रमाण देखील 21 टक्क्यांनी कमी झाले आहे.
मागील वर्षी आणि या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान झालेल्या अपघातांची आकडेवारी
जानेवारी 2018 |
जानेवारी 2019 |
फेब्रुवारी 2018 |
फेब्रुवारी 2019 |
मार्च 2018 |
मार्च 2019 |
एप्रिल 2018 |
एप्रिल 2019 | |
प्राणांतिक अपघात | 24 | 15 | 16 | 24 | 27 | 20 | 20 | 9 |
गंभीर अपघात | 38 | 33 | 22 | 35 | 30 | 36 | 35 | 23 |
किरकाेळ अपघात | 21 | 22 | 21 | 9 | 13 | 11 | 19 | - |
-