सदोष याद्यांच्या असंख्य तक्रारी तहसीलदारांकडे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:10 AM2020-12-08T04:10:45+5:302020-12-08T04:10:45+5:30
या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी यावेळी ज्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत त्यातील घोटाळा आजपर्यंत झाला नव्हता एवढा विचित्र प्रकाराने झालेला आहे, ...
या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी यावेळी ज्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत त्यातील घोटाळा आजपर्यंत झाला नव्हता एवढा विचित्र प्रकाराने झालेला आहे, यास स्थानिक ग्रामपंचायत, महसूल व तहसीलदार कार्यालय जबाबदार असल्याची भावना या तक्रारदार व नागरिकांमधे उफाळून आलेली आहे, काही मंडळींनी हेतुपुरस्कर आपल्याला विरोध करणाऱ्या मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागांमध्ये घालण्यास लावण्याचा प्रकार तसेच काही प्रभावी उमेदवारांची नावेच मतदार यादीतून नष्ट करण्याचा डाव रचला आहे, त्यामुळे अनेकजण त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचीत राहणार आहेत. काहींची नांवे मतदार यादीत न ठेवल्याने तर काहींची दोन- दोन तीन - तीन ठिकाणी नावे नोंदवून तर तर काही मृत्यू झालेल्यांची नावेही नोंदवून स्वत:ला अपेक्षित असलेल्या मतदारांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचेच या मतदारयाद्यातूून दिसते. अशा तक्रारी दिल्या गेल्या.
--
चौकट
हेतुपुरस्सर सदोष याद्या
या याद्या सदोष असल्याकारणाने त्या मतदारांची महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच तो कोणत्या भागात राहतोय याची खातरजमा करून त्या याद्या तयार कराव्यात व सर्वसामान्य मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा गैरप्रकार काही पुढाऱ्यांनी केलेला आहे तो हाणून पाडावा अशी मागणी उरुळी कांचनचे माजी सरपंच दत्तात्रय शांताराम कांचन, माजी उपसरपंच रामभाऊ तुपे, शिवसेना महिला आघाडीच्या हवेली तालुका प्रमुख सविता कांचन, हिंगणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य माऊली थोरात यांनी केली आहे.या याद्या सदोष असल्याकारणाने त्या मतदारांची महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच तो कोणत्या भागात राहतोय याची खातरजमा करून त्या याद्या तयार कराव्यात व सर्वसामान्य मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा गैरप्रकार काही पुढाऱ्यांनी केलेला आहे तो हाणून पाडावा अशी मागणी उरुळी कांचनचे माजी सरपंच दत्तात्रय शांताराम कांचन, माजी उपसरपंच रामभाऊ तुपे, शिवसेना महिला आघाडीच्या हवेली तालुका प्रमुख सविता कांचन, हिंगणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य माऊली थोरात यांनी केली आहे.
--