पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १५ विषयांच्या अभ्यास मंडळावरील काही सदस्यांच्या नियुक्त्या नियम डावलून झाल्याच्या तक्रारी प्राध्यापकांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केल्या आहेत. विभागप्रमुख असतानाही सदस्य नेमणे, कोणत्या निकषाखाली नियुक्ती करण्यात आली ते स्पष्ट न करणे, ठराविक लोकांच्याच मुलाखती घेणे, नोटिफेकशन न काढणे आदी बाबींवर गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत.महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (८) नुसार नुकत्याच १५ अभ्यास मंडळांवरील सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विषयांच्या अभ्यास मंडळासाठी प्रत्येकी ६ सदस्यांची निवड जाहीर करावयाची आहे.मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, अर्थशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, विधि, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, शिक्षण आदी विषयांच्या सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. मात्र यातील अनेक नियुक्त्या नियमबाह्य पद्धतीने झाल्या असल्याची तक्रार करण्यात आली आहे.विद्यापीठाकडून आणखी ६० पेक्षा जास्त विषयांच्या अभ्यास मंडळांवरील सदस्यांची निवड अद्यापही बाकी आहे, त्या वेळी या चुकांची पुनरावृत्ती होऊ नयेअशी मागणी प्राध्यापकांनी केली आहे.>अजून तक्रार नाहीअभ्यास मंडळांवरील नियुक्त्यांबाबत अद्याप अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यास त्याची शहानिशा करून योग्य त्या सुधारणा केल्या जातील.- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
पुणे विद्यापीठातील अभ्यास मंडळांवरील नियुक्त्यांना आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 5:00 AM