विकास चाटी पुणे : जगभरात कोरोना विषाणूचा कहर वाढत चालला आहे; मात्र प्रगत देशांमध्येच कोरोनाने थैमान घातले असून, मृत व बाधितांच्या संख्येत त्यांचा वाटा खूप मोठा आहे. तुलनेने भारतीय उपखंडातील देशात बऱ्याच अंशी नियंत्रण साधले आहे. जगभरात १० एप्रिलला एक लाख रुग्णांचा(१००४४०) कोरोनाने मृत्यू झाला; मात्र त्यानंतर केवळ १५ दिवसांत त्यात आणखी एक लाख २५ हजार ६०८ मृतांची वाढ झाली. अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, इंग्लंड आदी देशांमध्ये मृतांची संख्या अधिक आहे. एकट्या अमेरिकेत २७ एप्रिलपर्यंत कोरोना मृतांची संख्या ५६,१८९ पर्यंत गेली आहे. इटली, स्पेन, जर्मनी व इंग्लंडमध्येही २० हजारांपेक्षाही जास्त मृत झाले.अमेरिकेत १० एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान ३२,९७२, स्पेन ६,५५४, इटली ७,१२०, फ्रान्स ९,०४८, जर्मनी ३,०४६, इंग्लंड १०,५४३ व इराण १,३४२ इतकी मृतांच्या संख्येत वाढ झाली. याच कालावधित बाधितांच्या संख्येत अमेरिकेत ४,१४,४९५, स्पेन ६२,७११, इटली ४५,४१७, फ्रान्स ३४,९५९, जर्मनी ३४,५३५, इंग्लंड ६९,७०६ व इराण २०,००२ वाढ झाली.जगभरात या पंधरा दिवसांत बाधितांच्या संख्येत ११,२४,३५१ इतकी वाढ झाली. त्यापैकी वरील ७ देशांतील एकूण बाधितांची संख्या ६,८१,८२५ इतकी म्हणजे, ६१ टक्के इतकी आहे. पंधरा दिवसांतील जगभरातील एकूण मृतांच्या संख्येपैकी वरील ७ देशांतील मृतांची संख्या ७०,६२५ म्हणजे ७० टक्के एवढी आहे.>बºया होणाºया रुग्णांची संख्या दिलासादायकपंधरा दिवसांत अमेरिकेत ६४,०७४, स्पेन ३६,६८७, इटली ३०,०४३, फ्रान्स १८,५६१ व जर्मनी ५४,३९३ रुग्ण बरे झाले. जगभरातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४,०५,५४८ आहे. अमेरिकेत सरासरी दररोज ४,२७१ रुग्ण बरे, तर २,१९८ रुग्ण मृत झाले. स्पेनमध्ये बºया होणाºया रुग्णांची रोजची सरासरी २,४४५ असून, दररोज ४३६ रुग्ण मृत झाले आहे. इटली रोज सरासरी २ हजार रुग्ण बरे झाले असून, ४७४ रुग्ण मृत पावले आहेत. फ्रान्स सरासरी रोज १,२३७ रुग्ण बरे तर सरासरी रोज ६०३ रुग्ण मृत झाले.
CoronaVirus: युरोपीय देशात १५ दिवसांत एक लाख २७ हजार मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 4:01 AM