रिक्षात विसरलेले पावणे दोन लाख रुपये महिलेला मिळाले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 06:57 PM2018-03-24T18:57:28+5:302018-03-24T18:57:28+5:30
कात्रज पोस्ट आॅफिसमधून ग्राहकांचे १,७५००० रुपये घेवून आपल्या लहान मुलीसह नऱ्हेत जाण्यासाठी तिथून रिक्षात बसल्या.नऱ्हे येथील भूमकर चौकात उतरताना त्यांची लहान मुलगी झोपली असल्याने तिला सांभाळण्याच्या नादात रिक्षात विसरल्या.
पुणे: पोस्टामध्ये रिकरिंग एजंट चे काम करणाऱ्या महिलेचे रिक्षात विसरलेली १,७५००० रुपयांची रक्कम , दोन मोबाईल यांचा छडा लावण्याचे काम सिंहगड पोलिसांनी केले. सावनी सागर घायाळ (वय ३२,रा.नऱ्हे ) यांनी पैसै हरवल्याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घायाळ या २० मार्च रोजी कात्रज पोस्ट आॅफिसमधून ग्राहकांचे १,७५००० रुपये घेवून आपल्या लहान मुलीसह नऱ्हे येथे जाण्यासाठी तिथून रिक्षात बसल्या.नऱ्हे येथील भूमकर चौकात उतरताना त्यांची लहान मुलगी झोपली असल्याने तिला सांभाळण्याच्या नादात त्यांची पर्स रिक्षात विसरल्या. घरी गेल्यावर त्यांच्या सदर प्रकार लक्षात आला. त्यांनी सदर रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला .परंतु,रिक्षाचा नंबर माहीत नसल्याने त्यांना काहीच माहिती मिळू शकली नाही. त्यांनी याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर सिंहगड तपास पथकातील अधिकारी/ कर्मचारी यांनी सलग ३ दिवस विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून सदर रिक्षाचा क्रमांक मिळवला. त्यानंतर शुक्रवारी (दि.२३) रोजी रिक्षाचालकाचा शोध लावत त्याच्याकडून महिलेची विसरलेली पर्स, पावणे दोन लाख रुपये आणि २ मोबाईल फोन सदर महिलेस परत मिळवून दिले.
स्वारगेट सहायक पोलीस अधिक्षक डॉ शिवाजी पवार, सिंहगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश सोनावणे, कर्मचारी दत्ता सोनावणे , राहुल शेडगे, सचिन माळवे यांनी सदर कामगिरी केली .
............................