पार्किंगच्या वादात एकाचे नाकाचे हाड फ्रॅक्चर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:11 AM2021-01-18T04:11:25+5:302021-01-18T04:11:25+5:30
पुणे : बँक ऑफ बडोदा आणि अरिहंत कॉलेज या एकाच इमारतीत असलेल्या दोन संस्थांमधील कर्मचाऱ्यांमध्ये पार्किंगवरुन झालेल्या वादात एकाचे ...
पुणे : बँक ऑफ बडोदा आणि अरिहंत कॉलेज या एकाच इमारतीत असलेल्या दोन संस्थांमधील कर्मचाऱ्यांमध्ये पार्किंगवरुन झालेल्या वादात एकाचे नाक फ्रॅक्चर झाले. ही घटना सोलापूर रोडवरील आईसलँड पार्क या इमारतीच्या बेसमेंटमध्ये १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडली.
याप्रकरणी बँक ऑफ बदोडाचे शाखा व्यवस्थापक बिमोह मुंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव (वय ४२) यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यानुसार चेतन पारेख, भुषण पाटील, बिराजदार, सुरक्षारक्षक व इतर ३ ते ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बँक कर्मचारी आणि अरिहंत कॉलेजचे कर्मचारी यांच्यात नेहमी पार्किंगवरुन वाद होत होते. शनिवारी सकाळी त्यांचा वाद सुरु झाला. त्यावेळी अरिहंत कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी श्रीवास्तव यांना धक्काबुक्की करुन बँक कर्मचारी पांडुरंग गिड्डे यांना हाताने मारहाण केली. त्यात त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक महाडिक अधिक तपास करीत आहेत.