खूनप्रकरणी एकाला तेलंगणातून अटक, वारज्यातील आठवड्यापूर्वीची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 06:19 AM2018-01-08T06:19:30+5:302018-01-08T06:19:50+5:30

वारजे येथे आठवडाभरापूर्वी झालेल्या मजूर कविता राठोड हिच्या खून प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी अल्प माहितीच्या आधारे माग काढत तेलंगणातील नक्षलग्रस्त भागात जाऊन अटक केली़

 One person arrested in Telangana, one week before the murder | खूनप्रकरणी एकाला तेलंगणातून अटक, वारज्यातील आठवड्यापूर्वीची घटना

खूनप्रकरणी एकाला तेलंगणातून अटक, वारज्यातील आठवड्यापूर्वीची घटना

Next

पुणे : वारजे येथे आठवडाभरापूर्वी झालेल्या मजूर कविता राठोड हिच्या खून प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी अल्प माहितीच्या आधारे माग काढत तेलंगणातील नक्षलग्रस्त भागात जाऊन अटक केली़
गोपाळ बन्सी राठोड (वय २५, रा़ सहयोगनगर, वारजे) असे अटक केलेल्याचे नाव आहे़ मजूर कविता राठोड २९ डिसेंबर रोजी कामावरून घरी परतलीच नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर तिचा पती तारिया फुलसिंग राठोड (वय ३०, रा़ विठ्ठलनगर, वारजे) यांनी ३० डिसेंबरला पोलीस ठाण्यात हरविली असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर दोन दिवसांनी वारजे येथे आरएमडी कॉलेजच्या मुख्य दरवाजाशेजारी असलेल्या ओढ्यातील एका पाईपमध्ये महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता़ तो कविता राठोडचा असल्याचे निष्पन्न झाले़ वारजे पोलिसांनी याबाबत माहिती काढण्यास सुरुवात केल्यावर तिचे गोपाळ राठोड याच्याबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली़ गोपाळ राठोड मजुरीकाम करीत असे़ वारजे येथील पुलाखालील मजूर अड्ड्यावर तो येत व ठेकेदाराकडे काम करीत असे़ त्यातूनच त्याची कविताबरोबर ओळख झाली होती़ त्यादिवशी गोपाळ व कविता आरएमडी कॉलेजशेजारील ओढ्याच्या कट्ट्यावर बसले होते़ दुसºयाशी संबंध असल्यावरून त्यांच्यात भांडणे झाली़ त्यात गोपाळने तिला ढकलल्याने ओढ्यात पडली व तिचा मृत्यू झाला़ गोपाळने तिला पाइपमध्ये कोंबले व तेथे असलेला कडबा, फळकाटे, प्लॅस्टिक कागद व बारीक लाकडे टाकून तिला पेटवून दिले होते़ त्यानंतर तो यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामधील बेलखंड या मूळ गावी गेला़ सीसीटीव्ही आणि अन्य काही किरकोळ तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आठवडाभरात संशयित आरोपी गोपाळ राठोड याला तेलंगण-आंध्र प्रदेश बॉर्डरवरील नक्षलवादी भागातून ताब्यात घेतले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त डॉ़ बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे, प्रकाश खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक एस़ एन. धावडे, मॅगी जाधव, संजय दहीभाते, नितीन जगदाळे यांनी केली़

Web Title:  One person arrested in Telangana, one week before the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.