कांदा मातीमोल; खर्चही निघेना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 02:02 AM2018-12-07T02:02:49+5:302018-12-07T02:02:55+5:30
जिल्ह्यात प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदापिकाची काढणी सुरु झाली आहे;
शेलपिंपळगाव : जिल्ह्यात प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदापिकाची काढणी सुरु झाली आहे; मात्र दूषित हवामानाच्या प्रादुर्भावाने कांद्यावर पडलेल्या विविध रोग आणि पाणीटंचाईमुळे पिकाच्या उत्पादनात कमालीची घट जाणवू लागली आहे. पिकाचे घटलेले उत्पादन आणि नीचांकी पातळीवरील बाजारभावामुळे किमान पिकाच्या उत्पादनावरील भांडवलखर्च तरी भागेल का, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण होऊ लागला आहे. चालू वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत एकरी उत्पादनात १५ ते २० टक्क्यांची घट झाली आहे. कांद्याचे दर किलोला अवघे ४ ते ७ रुपयांवर आल्याने शेतकºयांना उत्पादनखर्चही मिळेनासा झाला आहे.
खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये आगाप लागवडयुक्त कांदा काढणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. कांदा रोपाचा व लागवडीकाळात पाण्याचा तुटवडा, मजुरांची टंचाई, दूषित हवामान, अवकाळी पाऊस, रोगराई, वाढलेल्या खतांच्या किमती यांसारख्या उद्भवलेल्या आपत्तीमुळे पिकाचा उत्पादनखर्च दुपटीने वाढला आहे. पिकाच्या लागवडीपासून पिकांवर कीड, मावा, तेल्या, पीळ रोगांचा प्रादुर्भाव झाला. शेतकºयांनी रासायनिक औषधांची फवारणी करून त्यावर आळा घालण्याचे प्रयत्न केले; परंतु सततच्या बदलत्या वातावरणापुढे तेही अपुरेच पडले आहेत. या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत एकरी उत्पादनात १५ ते २० टक्क्यांची घट झाली आहे. त्यातच शेतकºयांचा कांदा बाजारात जाताक्षणी पिकाचे दर किलोला अवघे ४ ते ७ रुपयांवर आल्याने शेतकºयांची निराशा होत आहे.
मोठ्या मेहनतीने पिकाची जोपासना करून शेतकºयांनी उत्पादन घेतले असले तरीसुद्धा बाजारात पिकाला समाधानकारक भाव प्राप्त होत नसल्याने शेतकºयांच्या हाती काहीही लागत नसल्याची सत्यस्थिती आहे. भविष्यात बाजारभाव वाढेल,असा अनुमान लावून काही उत्पादक कांद्याची साठवणूक करीत आहेत; परंतु कांदा हे नाशवंत पीक असल्याने त्याची जास्त काळ साठवण करण्यात अडचण येते. परिणामी, आर्थिक गरजेपोटी ८० ते ८५ टक्के पीक उत्पादक शेतकºयांना कांदा काढणीनंतर मिळेल त्या भावात खपवावा लागत आहे. यामुळे कांदापिकाला हमीभाव ठरवून देण्याची मागणी केली जात आहे.
महिन्यापूर्वी कांद्यास प्रतिकिलो ८ ते १० रुपये बाजारभाव मिळत होता; परंतु त्या वेळी शेतकºयांचा कांदा काढणीयोग्य झालेला नव्हता. सध्या शेतकºयांचा कांदा परिपक्व होऊन काढणीयोग्य
झाला आहे. त्यामुळे तो काढणीनंतर विक्रीसाठी थेट बाजारात पाठविला जात आहे. मात्र सध्या बाजारात प्रतिकिलोला ४ ते ७ रुपये
असा कवडीमोल बाजारभाव मिळत आहे.
वर्षभरातील प्रमुख नगदी पिकांपैकी कांदा हे शेतकºयांचे आर्थिक उत्पन्नाचे ‘हुकुमी’ पीक आहे. परंतु पिकाला बाजारभावाची शाश्वती नसल्याने उत्पन्नाची खात्री ठेवता येत नाही. शासनाने कांद्याला आधारभूत हमीभाव ठरवून देणे निश्चितच फायदेशीर ठरेल. पिकाच्या उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याला
चांगला बाजारभाव मिळणे अत्याआवश्यक आहे.
- दिलीप मोहिते-पाटील,
माजी आमदार खेड.