ओतूरला कांदाभावात ५० रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:11 AM2021-03-15T04:11:03+5:302021-03-15T04:11:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार ओतूर येथील उपबाजारात रविवारी फक्त १३ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार ओतूर येथील उपबाजारात रविवारी फक्त १३ हजार ४३० कांदा पिशव्यांची आवक झाली. आवक कमी झाल्याने प्रतवारीनुसार नं.१ गोळा कांदा १० किलोमागे ५० रुपयांची वाढ झाल्याची माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
रविवारी प्रतवारीनुसार १० किल़़ोचे भाव खालील प्रमाणे : कांदा नं. १ (गोळा) १७० ते २०० रुपये. सुपर कांदा; १४० ते १७० रुपये.
कांदा नं. २- (कवचट) : १२० ते १४० रुपये.
कांदा नं. ३-(गोल्टा) ९० ते १३० रुपये.
कांदा नं. ४ (गोलटी/ बदला) २० ते १०० रुपये.
बटाटा बाजारभाव : रविवारी ३९० बटाटा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार १० किलोचे भाव ३० ते १५० रुपये बाजारभाव मिळाला. भाव स्थिर राहिले अशी माहिती ओतूर मार्केटचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.