गुलटेकडी-मार्केट यार्ड येथे कांद्याच्या दरात मोठी घसरण;  किलोमागे ८ ते १० रुपयांनी उतरले दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 04:57 PM2017-12-01T16:57:48+5:302017-12-01T17:01:30+5:30

शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे एकाच दिवशी नवीन हळवी कांद्याची तब्बल २०० ते २२० ट्रक आवक झाली. यामुळे कांद्याचे दर २२० ते २८० रुपये दहा किलोपर्यंत खाली आले.

Onion prices fall in Gultekadi-Market yard; The rate of rupees 8 to 10 comes down | गुलटेकडी-मार्केट यार्ड येथे कांद्याच्या दरात मोठी घसरण;  किलोमागे ८ ते १० रुपयांनी उतरले दर

गुलटेकडी-मार्केट यार्ड येथे कांद्याच्या दरात मोठी घसरण;  किलोमागे ८ ते १० रुपयांनी उतरले दर

Next
ठळक मुद्देएकाच दिवशी नवीन हळवी कांद्याची तब्बल २०० ते २२० ट्रक आवकअचानक आवक वाढल्याने व कांद्याचा दर्जा कमी असल्याने घसरण : कांदा व्यापारी

पुणे : केंद्र शासनाच्या कांदा आयतीची धोरणामुळे दर पडण्याची भिंती व ढगाळ हावामानामुळे पावसाची शक्यता यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे एकाच दिवशी नवीन हळवी कांद्याची तब्बल २०० ते २२० ट्रक आवक झाली. यामुळे कांद्याचे दर २२० ते २८० रुपये दहा किलोपर्यंत खाली आले. किरकोळ बाजारात कांद्याचे दर किलो मागे ८ ते १० रुपयांनी उतरले.
यंदा राज्यात बहुतेक सर्वच भागात परतीच्या पावसाने पिकांचे प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामुळे नवीन हवळी कांद्याची आवक कमी झाली होती, तर जुन्या कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला. यामुळे पंधरा दिवसांपूर्वीच पुणे बाजार समितीत कांद्याला उच्चांकी म्हणजे ३०० ते ४०० रुपये दहा किलोला दर मिळाले. कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र आणि पुण्यात इजिप्तचा कांदा आला देखील. परंतु सर्वसामान्य ग्राहकांकडून त्याला फारसा उठाव मिळाला नाही. यामुळे  परदेशातून कांदा आयात करून देखील दरामध्ये फार फरक पडला नाही. 
परंतु शासनाकडून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्याची शक्यता व्यक्त केली जाता आहे. यामुळे भविष्यात कांद्याचे दर कोसळण्याची भिंत शेतकऱ्यांमध्ये आहे. तर सध्याचे ढगाळ वातावरणामुळे पाऊस झाल्यास हाताशी आलेले कांद्याचे पिक पुन्हा खराब होईल, या धास्तीमुळे शेतकऱ्यांनी नवीन हळवी कांद्याचा हंगाम सुरु होण्यास पंधार ते वीस दिवस शिल्लक असताना कच्चाच कांदा बाजारात विक्रीसाठी आणला आहे. यामध्ये प्रामुख्याने संगमनेर विभागातून व श्रीगोंदा परिसरातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली. शुक्रवारी मार्केट यार्डमध्ये नवीन हळवी कांद्याचे २०० ते २२० ट्रक आणि जुन्या कांद्याचे १५ ते २० ट्रक आवक झाली. आवक वाढल्याने दरामध्ये देखील मोठी घट झाली. सर्वसाधारण कांद्याला २७० ते २८० दर देण्यात आले. तर संगमनेर विभागातील कांद्याला २२० ते २८० , श्रींगोदा परिसरातील कांद्याला १५० ते २५० रुपये दहा किलो आणि जुन्या कांद्याला ३०० ते ३६० रुपये दहा किलो दर देण्यात आला.

दर पडण्याच्या भिंती आवक वाढली
परदेशातून आयात करण्यात येत असलेल्या कांद्यामुळे दर पडण्याची भिंती शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे नवीन हवळी कांद्याची आवक सुरु होण्यासाठी अद्याप पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी बाकी असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी बाजारात दाखल केला आहे. यामध्ये प्रामुख्याने संगमनेर व श्रींगोदा परिसरातून आवक झालेल्या कांद्यामध्ये ६० ते ७० टक्के कांदा कच्चा व अपरिपक्व कांदाच विक्रीसाठी आणला आहे. अचानक आवक वाढल्याने व कांद्याचा दर्जा कमी असल्याने कांद्याच्या दरामध्ये एकाच दिवशी आठ ते दहा रुपयांची घसरण झाली आहे.
- रितेश पोमण, कांद्याचे व्यापारी, गुलटेकडी-मार्केट यार्ड

Web Title: Onion prices fall in Gultekadi-Market yard; The rate of rupees 8 to 10 comes down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.