बारामती - नुकतेच दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत; मात्र अद्याप विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात गुणपत्रिका मिळण्याची तारीख जाहीर झालेली नाही. ११वी प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महाविद्यालयांनी ‘आॅनलाइन’ प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्येदेखील याच पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत. शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल, शारदाबाई पवार शैक्षणिक संकुल, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, सोमेश्वरनगर शैक्षणिक संकुुल, मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय आदी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.काही महाविद्यालयांनी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे, तर काही ठिकाणी प्रवेशासाठी अर्जविक्री सुरू करण्यात झाली. लवकरच दहावीचे गुणपत्रक मिळणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रवेशप्रक्रियेला वेग येईल. सध्या प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थी आणि पालकांची धांदल उडाली आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने बारामती शहरातील महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रियेचा आढावा घेतला.आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया ही महाविद्यालयाच्या दृष्टीने सोपी झाली आहे. त्यामुळे प्रशासन कारभार हा सुलभ झाला आहे.या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेमुळे कर्मचारी व व्यवस्थापन यांचा अतिरिक्त ताण कमी झाला आहे. परंतु, ही आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया विद्यार्थी व पालक यांच्यासाठी त्रासदायक आहे. तसेच, ही प्रवेशप्रक्रिया पालक व विद्यार्थी यांच्या पचनी पडायला वेळ लागणार असल्याचे चित्र आहे. काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महाविद्यालयातच अर्ज भरण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे. ती काही ठिकाणी विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी खासगी सुविधांचा आधार घ्यावा लागत आहे.भवानीनगर येथील श्री छत्रपती हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात २४० विज्ञान शाखेच्या जागा आहेत. त्यांमध्ये ८० जागा अनुदानित आहेत. १६० कला शाखेच्या आहेत. पूर्ण जागा अनुदानित आहेत. १६० जागा वाणिज्य शाखेसाठी आहेत. निकालाची प्रत मिळाल्यानंतर थेट प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. सध्या केवळ अर्जविक्री सुरू करण्यात आली आहे.- एस. बी. थोरात, प्राचार्यश्री छत्रपती हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय.यांनी सांगितले, की या महाविद्यालयात ११वी विज्ञानसाठी त्यापैकी ३ तुकड्या अनुदानित ३६० जागा आहेत. तर, विनाअनुदानित ३६० आहेत. तर, वाणिज्य शाखेसाठी २ तुकड्या आहेत. त्यांपैकी १ अनुदानित १२०, तर दुसरी विनाअनुदानित १२० अशी आहे. कला शाखेसाठी ३ तुकड्या असून त्या तिन्ही अनुदानित आहेत. सध्या आॅनलाईन मेरीट अर्ज भरणे, जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मेरीट अर्ज विक्री सोमवार (दि. ११) पासून सुरू करण्यात आली आहे. दहावीचे निकाल प्रत्यक्ष हाती आल्यानंत प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. - डॉ. भरत शिंदे, प्राचार्यविद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचेया महाविद्यालयात विज्ञान, कला, वाणिज्य शाखेसाठी जागा आहेत. एमसीव्हीसीमध्ये उद्यानविद्याशास्त्र, द्विलक्ष्यी अभ्यासक्रमात पीक विज्ञान, प्राणिशास्त्र, दुग्धव्यवसाय यासाठी प्रवेश आहेत. प्रवेश ‘आॅनलाईन’, तर प्रक्रिया ‘आॅफलाईन’ सुरू आहे. गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील. - आर. ए. देशमुख, प्राचार्यशारदाबाई पवार महिला महाविद्यालयप्रवेशप्रक्रिया आॅनलाईन सुरू करण्यात आली आहे. गुुणवत्तेनुसार सर्व प्रवेश दिले जात आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बेकरी आणि कन्फेक्शनरी, आॅटो इंजिनिअरिंगलादेखील प्रवेश सुरू आहेत. तसेच, विनाअनुदानितमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. निकाल हाती मिळाल्यानंतर प्रवेशप्रक्रिया सुरू होईल,- डॉ. चंद्रशेखर मुरुमकर, प्राचार्य,तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय
‘आॅनलाइन’ प्रवेश अर्ज; विद्यार्थ्यांची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 1:23 AM