आज दहावीचा ऑनलाइन निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:12+5:302021-07-16T04:09:12+5:30
नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ...
नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार निकाल तयार करण्याची कार्यपद्धती प्रसिद्ध झाली. राज्यातील सर्व शाळांनी २३ जून ते २ जुलैपर्यंत माध्यमिक शाळांनी संगणक प्रणालीमध्ये गुण नोंदवले. राज्य मंडळाने ३ जुलै ते १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली.
-------------
दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेले एकूण विद्यार्थी : १६,५८,६२४
मुले : ९,०९,९३१
मुली : ७,४८,६९३
------------------
कसा पाहावा दहावीचा निकाल?
परीक्षाच न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांकडे बैठक क्रमांक उपलब्ध नाही. मात्र, राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना नाव टाकून बैठक क्रमांक प्राप्त करता येईल. एकसारखे नाव असल्यास जन्मदिनांक व आईचे नाव यावरून विद्यार्थ्यांना स्वत:चा बैठक क्रमांक ओळखता येऊ शकेल.
-----------------------
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ : http://result.mh-ssc.ac.in
-----------------------------