भाटघर धरणातील पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 04:24 PM2019-05-07T16:24:18+5:302019-05-07T16:34:27+5:30
भोर पासुन सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर कांबरे गावातील धरणाच्या पात्रात कांबरेश्वराचे मंदीर आहे. हे मंदीर १० महिने पाण्यात असते .
भोर: भाटघर धरणातून सातत्याने होणा-या विसर्गामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. पाणी कमी झाल्यामुळे कांबरे (ता.भोर) येथे भाटघर धरणात गेलेले कांबरेश्वराचे मंदीर बाहेर आले आहे. प्राचीन असलेले हे मंदीर पाहण्यासाठी आजुबाजुच्या गावातील नागरीक या ठिकाणी येत आहेत.
भोर पासुन सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर कांबरे गावातील धरणाच्या पात्रात कांबरेश्वराचे मंदीर आहे. हे मंदीर १० महिने पाण्यात असते .धरणातील पाणी कमी झाल्याने मंदीर पाण्या बाहेर आले आहे. वेळवंड नदीमध्ये प्रचिन असे पांडव कालीन शिवमंदीर आहे. या मंदीराचे मुळ नाव कर्मगरेश्वर आहे. परंतु हे मंदीर कांबरे गावाच्या हद्दीत असल्यामुळे कांबरेश्वर नावाने ओळखले जाते. या मंदीराचे वैशिष्टये म्हणजे पांडवकालीन असुन ते पांडवांनी बांधले आहे, अशी आख्यायिका आहे. मे व जुन दोन महिनेच हे मंदीर पाण्याबाहेर असते. पुर्वी धरण नव्हते त्यावेळी मंदीराच्या जागेवर शेती होती. दरवर्षी, पडणा-या पावसामुळे धरणात पाण्याबरोबर वाहात असलेल्या गाळामुळे मंदीर जमिनीखाली गेले आहे. मात्र मंदिराचा पाया आणि त्यावरील बांधकाम असुनही भक्कम आहे. धरणातील पाण्याच्या लाटांमुळे थोडी फार मोडतोड झाली आहे. मंदीरात स्वयंभु शिवलिंग असुन तसेच पार्वती मातेची मूर्ती व नंदी आहे.
पुर्वी मंदिरात जाताना वर चढुन जावे लागत होते. मात्र, गाळामुळे मंदिराच्या पाय-या गाडल्या गेल्या आहेत. मंदीरासमोर नंदी असलेला चौथरा आहे. मंदिराच्या कळसाचे व वरील बाजुचे बांधकाम चुनखडक वाळु आणि भाजलेल्या विटात आहे. तर मंदिराच्या भीतीचे बांधकाम दगडात केलेले आहे. मात्र, दगड साधेसुधे नसुन २० मजुरांना देखील एकत्र येऊन उचलता येणार नाहीत. इतके मोठे दगड आहेत. पांडवांनी त्या काळात कुशल कलाकृतीचा वापर करुन आयातकृती दगड एकावर एक बसवुन मंदीराची रचना केली आहे.
.........
धरणात असलेले मंदीर त्याच पध्दतीने धरणाचे काठावर असावे अशी येथील नागरिकांची इच्छा असुन मंदीर बांधण्यासाठी प्रयत्न सुरु सुदाम ओंबळे व नथु सुकाळे सांगितले.
--------
भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असलेले कांबरे येथीर कांबरेश्वराचे मंदीर पाण्याबाहेर आले आहे