पासधारकांच्या संपकाळातील  भरपाईचा आदेश राहिला कागदावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 06:48 PM2018-03-02T18:48:40+5:302018-03-02T18:48:40+5:30

संपकाळात पासधारकांच्या बुडालेल्या चार दिवसांची भरपाई फेब्रुवारी महिन्यात करण्याचे एस. टी. महामंडळाने दिलेले आदेश कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे. अनेक पासधारकांपर्यंत याबाबतची माहितीच न पोहचल्याने भरपाईचा कालावधी उलटून गेला आहे.

The order for compensation for the holders of the pass holders was on paper | पासधारकांच्या संपकाळातील  भरपाईचा आदेश राहिला कागदावर 

पासधारकांच्या संपकाळातील  भरपाईचा आदेश राहिला कागदावर 

Next
ठळक मुद्देएस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पासधारकांना पास वापरता आला नाही.पासधारकांच्या मुदतवाढ परिपत्रकाबाबत प्रवाशांना अंधारात ठेवल्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पासधारकांच्या संपकाळातील  भरपाईचा आदेश राहिला कागदावर 
पुणे : संपकाळात पासधारकांच्या बुडालेल्या चार दिवसांची भरपाई फेब्रुवारी महिन्यात करण्याचे एस. टी. महामंडळाने दिलेले आदेश कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे. अनेक पासधारकांपर्यंत याबाबतची माहितीच न पोहचल्याने भरपाईचा कालावधी उलटून गेला आहे. प्रशासनाने लाखो पासधारकांना अंधारात ठेऊन फसवणुक केल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. 
मागील वर्षी ऐन दिवाळीत एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पासधारकांना चार दिवसांचा पास वापरता आला नाही. दि. १७ ते २० आॅक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत बस पूर्णपणे बंद होत्या. त्यामुळे आधीच पैसे देऊन मासिक किंवा त्रैमासिक पास घेतलेल्या प्रवाशांचे चार दिवसांचे पैसे वाया गेले होते. त्यामुळे संपकाळातील दिवसांची भरपाई मिळावी, यासाठी प्रवाशांकडून मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ही मागणी मान्य करीत एस.टी.च्या महाव्यवस्थापकांनी (वाहतुक) दि. ३० जानेवारी रोजी परिपत्रक काढून दि. २८ फेब्रुवारीपर्यंत कालावधीत पासचा कालावधी वाढवून देण्याचे आदेश दिले होते. यासाठीचे अधिकार विभागीय वाहतूक अधिकारी किंवा आगार व्यवस्थापकांना राहतील. ही मुदतवाढ सध्या काढलेल्या पासावरच असेल. हे पत्र सर्व संबंधित तसेच वाहकांच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही परिपत्रकात नमुद करण्यात आले होते. 
मात्र, प्रत्यक्षात अनेक प्रवाशांपर्यंत या मुदतवाढीबाबत माहितीच पोहचली नसल्याचे समोर आले आहे. 
 दररोज सासवड ते स्वारगेट एसटीने  प्रवास करणारे दत्तात्रय फडतरे हे याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिपत्रकाबाबत प्रवाशांना काहीच माहिती नाही. प्रवाशांना याबाबत अंधारात ठेवल्याने सवलत मिळू शकली नाही. याबाबतची माहिती पासधारकांना सहजपणे दिसेल, अशा ठिकाणी लावणे, वृत्तपत्रांमध्ये याबाबत प्रसिध्दी देणे, सोशल मीडियावर प्रसार करणे आवश्यक होते. मात्र, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळे प्रशासनाने प्रवाशांना अंधारात ठेऊन फसवणुक केली आहे. आगार प्रमुखांना याबाबत विचारले असता त्यांनी कुणाचीही तक्रार न आल्याने हे परिपत्रक लावले नाही, असे सांगितले.
--------------------------
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 
परिपत्रकाबाबत प्रवाशांना अंधारात ठेवल्याबाबत दत्तात्रय फडतरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तसेच दि. २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत संपल्याने बहुतेकांना चार दिवसांची मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा हा कालावधी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. 
------------

    
 

Web Title: The order for compensation for the holders of the pass holders was on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.