त्यासाठी शेतकरी संघाचे आध्य्क्ष राजेंद्र मारणे, सचिव साहेबराव भेगडे यांनी तालुका कृषी आधीकारी हसरमनी याना पत्र दिले. हसरमनी यानी वरिष्ठांना विचारून तारीख निश्चीत करू व शेतकऱ्यानी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीचे उत्पन्न वाढवावे असे सांगितले. २०२०साली जळगाव येथे शेतकरी सहल आयोजित केली होती त्याला शेतकऱ्यानी उत्तम प्रतिसाद दिला व आंबा लागवड हळद लागवड केळी लागवड इत्यादी माहिती घेऊन तसा प्रयोग मुळशीत यशस्वी करून आंबा लागवड केळी हळद लागवड यशस्वी केळी स्ट्रॉबेरी पिकातूण लाखो रुपये मिळविले व आदर्श निर्माण केला .त्यामुळे शेतकरी आभ्यास सहलीचे आयोजन करण्याची मागणी करत आहेत . यावेळी कृषी आधीकारी गवळी .शेतकरी संघ संचालक रासू शेलार व तुकाराम सुर्वे .माणिकराव शिण्ड्र हजर होते
मुळशीत शेतकरी सहलीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:13 AM