आरोग्य शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:10 AM2020-12-08T04:10:23+5:302020-12-08T04:10:23+5:30
मानगाव येथील चापडीतील गोडबोले महाराज स्मारकाजवळ जिल्हा प्राथमिक शाळेत शिबिराचे आयोजन केले. १२० नागरिकांची तपासणी करून मोफत औषधे दिली. ...
मानगाव येथील चापडीतील गोडबोले महाराज स्मारकाजवळ जिल्हा प्राथमिक शाळेत शिबिराचे आयोजन केले. १२० नागरिकांची तपासणी करून मोफत औषधे दिली. डॉ. प्रल्हाद शिंदे, डॉ. अश्विनी बुद्धे यांनी तपासणी केली तर शिल्पा बोकील, ऋता देवळणकर, कार्तिकी देवळणकर यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बारकू शिंदे, गणेश क्षीरसागर, सिद्धेश्वर जाधव, रवी बुद्धे, अक्षय देवळणकर, अपूर्वा देवळणकर, गुरुप्रसाद सारपाले, महेश थिगळे उपस्थित होते. अजित वग्गा यांनी सूत्रसंचालन केले तर राकेश बुद्धे यांनी आभार मानले.
--
थिंक टँक कल्पनाविष्कार स्पर्धा उत्साहात
पुणे : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी थिंक टॅंक या स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत राज्यातल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी महाविद्यालयांचे २७ संघ १०० विद्यार्थ्यांसह सहभागी झाले.
सिरील वर्गेसी, सुचिता घाटीकर, यशस्वी शर्मा व अंशुल कुमार या विद्यार्थ्यांचा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. असे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले. डॉ. पुष्पराज वाघ, महेश महांकाळ यांनी परिश्रम घेतले.