फुलवडेत शोभिवंत मासेपालन व्यवसाय प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:10 AM2021-03-21T04:10:31+5:302021-03-21T04:10:31+5:30

महिला व बेरोजगार तरुणांना शोभिवंत माशांची पैदास व पालन हा एक पर्यायी विश्वसनीय जोडधंदा ठरू शकतो. शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायाचा ...

Ornamental Fisheries Business Training in Flowers | फुलवडेत शोभिवंत मासेपालन व्यवसाय प्रशिक्षण

फुलवडेत शोभिवंत मासेपालन व्यवसाय प्रशिक्षण

Next

महिला व बेरोजगार तरुणांना शोभिवंत माशांची पैदास व पालन हा एक पर्यायी विश्वसनीय जोडधंदा ठरू शकतो. शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायाचा एकात्मिक पद्धतीने विकास साधण्याचा दृष्टिकोन शासनाने ठेवला आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभागांतर्गत सीआयएफई (CIFE) यांच्यामार्फत शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायाचे प्रशिक्षण फुलवडे येथे आयोजित केले होते. रंगीत माशांच्या जाती, अक्युरियम बनविणे, माशांचे खाद्य व्यवस्थापन, माशांचे आजार व उपचार, मार्केटिंग, अँक्युरियम सुशोभित करणे आदी विविध विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सीआएफई मार्फत अँक्वाकल्चर विभागाचे प्रमुख किशोर कुमार कृष्णानी, प्रा. माधुरी पाठक, चंद्रकांत, बुधाजी डामसे, लक्ष्मण कोकणे, पुष्पा शेळके, नारायण भोकटे यांनी मार्गदर्शन केले. शोभिवंत मत्स्यपालन प्रशिक्षणास कोंढरे, जांभोरी, बोरघर, जुने आंबेगाव, फुलवडे, डिंभे या गावातील ४६ महिलांनी सहभाग घेतला. महिलांनी प्रशिक्षणात तयार केलेले अँक्युरियम मासे साहित्य शेवटच्या दिवशी महिलांना देण्यात आले. मंदा भोकटे, सुगंधा डामसे, मंगल जंगले, शालिनी जंगले, सखुबाई भोकटे, सीता असवले यांनी मनोगत व्यक्त केले.

--

फोटो क्रमांक : २०डिंभे मस्तपालन प्रशिक्षण

ओळी - फुलवडे (ता. आंबेगाव )येथील शास्वात संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेताना आदिवासी महिला.

Web Title: Ornamental Fisheries Business Training in Flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.