१ हजार ४३१ ग्रामपंचायतींपैकी १ हजार ११४४ गावांत हाताला कामजिल्ह्यात रोहयोवर ४२ हजार ५३६ मजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:12 AM2021-03-14T04:12:34+5:302021-03-14T04:12:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. १ हजार ४३१ गावांपैकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. १ हजार ४३१ गावांपैकी जवळपास १ हजार १४४ गावात कामे सुरू आहे. रोहयोसाठी २ लाख २३ हजार ३७२ जॉब कार्ड धारकांची नोंदणी करण्यात आली असून या पैकी ४२ हजार ५३६ जॉब धारक रोहयोच्या कामावर सध्याच्या स्थितीत काम करत आहेत.
जिल्ह्यात रोजगार हमी योजने अंतर्गत १०० दिवस कामाचे मोहिम सुरू आहे. या अंतर्गत घरकुल, पाणंद रस्ते, शोष खड्डे, रोपवाटीका, फळबाग लागवड, स्वच्छतागृहे, विहिरी, वृक्षारोपण, गोठे, सुरक्षा भिंती, रेशीम उद्योग अशी कामे सुरू आहेत. या अंतर्गत अनेक मजुरांच्या हाताला जिल्ह्यात कामे दिली आहेत.
पुणे जिल्ह्यात या वर्षी जवळपास २ लाख २३हजार ३७२ जॉब कार्ड धारकांची नोंद करण्यात आली आहे. त्यातील ४२ हजार ५३६ जॉब कार्ड धारकांच्या हाताला कामे आहेत. इंदापुर, जुन्नर, खेड तालुक्यात रोहयोची सर्वाधिक कामे सुरू आहेत. तर हवेली, मुळशी आणि वेल्हे तालुक्यात सर्वाधिक कमी कामे सुरू आहेत. आतापर्यंत रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरांना कामे देण्याचे ४१ टक्के उद्दीष्ट पुर्ण झालेले आहे. येत्या काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
चौकट
सर्वात कमी रोजगार वेल्हे तालुक्यात
जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वात कमी कामे वेल्हे तालुक्यात सुरू आहेत. वेल्हे तालुक्यात एकुण ७० ग्रामपंचयाती आहेत. यातील केवळ ४३ गामपंचायतीत रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. तालुक्यात ७७४ मजुर या योजने अंतर्गत कामे करत आहेत. तर त्या नंतर सर्वात कमी रोहयोची कामे मुळशी तालुक्यात सुरू आहेत तालुक्यातील केवळ ५५ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोची कामे सध्याच्या स्थितीत सुरू आहे.
कोट
सध्या रोजगार हमी योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे हाताला रोजगार मिळाला आहे. पाणंद रस्ते, स्वच्छतागृह तसेच रस्त्यांची कामे सध्या मी करत आहे. याचा लाभ आम्हाला मिळत आहे. येत्या काळात जिल्ह्यात ही कामे वाढतील अशी अपेक्षा आहे.
- रामनाथ कांबळे(रोहयो मजुर बारामती)
कोट
खेड तालुक्यात रोहयोची मोठ्या प्रमाणत सुरू आहे. रोहयोच्या कामामुळे आम्हा पतीपत्नींना सध्या कामे मिळाली आहे. ही कामे करून आम्ही शेतातलीही कामे करतो आहे. १०१ दिवस मोहिमेअंतर्गत आम्ही आमची नोंदणी केली आहे.
- शंकर चव्हाण, रोहयो मजुर खेड तालुका
रोहयोचा आरखडा
जिल्ह्यातील एकुण जॉब कार्ड धारक २ लाख २३ हजार ३७२
सध्या सुरू असलेली कामे ५२४
तालुकानियाह रोहयोची स्थिती
तालुका एकुण ग्रामपंचायती काम सुरू असलेल्या ग्रामपंचायती
आंबेगाव १०५ ७९
बारामती १०५ ९८
भोर १५५ १४०
दाैंड ८० ७९
हवेली १०१ ६२
इंदापुर ११५ १०६
जुन्नर १४३ १२४
खेड १६४ ११९
मावळ ११४ ८९
मुळशी ९८ ५५
पुरंदर ८७ ७१
शिरूर ९४ ७९
वेल्हे ७० ४३
एकुण १४३१ ११४४