: वारवडीत सभामंडपाचे भूमिपूजन
गराडे: एकजुटीने काम केल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी निवडणुका झाल्यावर लगेच दहा लक्ष रुपयांचा निधी सभामंडपास उपलब्ध केला. असेच एका विचाराने काम केल्यास गावचा सर्वांगीण विकास होईल व पुढील काळात सर्वांना काम करण्याची संधी देऊ, असे माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांनी यावेळी सांगितले.
वारवडी ( ता. पुरंदर ) गावात दहा लाख रुपये सभामंडप भूमिपूजन कात्रज दूध संघ संचालक गंगाराम जगदाळे, थापेवारवडी सरपंच रुपाली खवले, उपसरपंच नीलेश जगदाळे, वर्षा खवले व अनिल वाडकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी गराडेचे सरपंच नवनाथ गायकवाड, उपसरपंच नितीन जगदाळे, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश जगदाळे, विजय जगदाळे, पोलीस पाटील कल्पेश वाडकर, सुरेश खवले, मुक्ता पवार, संजय रावडे, विजय ढोणे, रोहित खवले, बाळासाहेब खवले, उत्तम खवले, शंकर वाडकर दत्तात्रय वाडकर, बापू वाडकर, पप्पू वाडकर, दादा पवार, भगवान वाडकर, संपत वाडकर, तानाजी वाडकर, आप्पा खवले, दौलत खवले, संजय खवले आदी उपस्थित होते.
मागील पाच वर्षातील सरपंच म्हणून केलेल्या थापेवाडी - वारवडी गावच्या विकासकामांमुळे सर्वानुमते गावाने नीलेश जगदाळे यांना याही वर्षी बिनविरोध निवडून दिले तसेच त्यांनी दिलेला शब्द पाळला.असे अनिल वाडकर यांनी या वेळी सांगितले.
नीलेश जगदाळे म्हणाले की, बऱ्याच वर्षापासून रखडलेले सभामंडपाचे काम मार्गी लागले त्याचा आनंद होतोय.
१७ गराडे भूमिपूजन
वारवडी ( ता. पुरंदर ) येथे सभामंडपाचे भूमिपूजन करताना गंगाराम जगदाळे समवेत रुपाली खवले, नीलेश जगदाळे व इतर.