कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:11+5:302021-04-12T04:09:11+5:30
श्री गुरू गौतम मुनी मेडिकल चैरिटेबल ट्रस्ट आणि कोठारी चैरिटेबल ट्रस्ट यांचा उपक्रम .............,,,................ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ...
श्री गुरू गौतम मुनी मेडिकल चैरिटेबल ट्रस्ट आणि कोठारी चैरिटेबल ट्रस्ट यांचा उपक्रम
.............,,,................
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शकुंतला शांतिलालजी कोठारी यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने कोरोना पेशंटना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोरोनामध्ये बेड मिळत नाहीत. अनेकजण घरी होम क्वारंटाईन होत आहेत. मात्र, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे व बेड मिळत नाहीत, त्या पेशंटकरिता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सेवा, श्री गुरू गौतम मुनी मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट, अरण्येश्वर आणि कोठारी चॅरिटेबल ट्रस्ट वडगाव शेरी या दोन्ही संस्था व समाजातील दानशूर व्यक्तिंद्वारे उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
श्री गुरु गौतम मुनी मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट व कोठारी चॅरिटेबल ट्रस्ट हे मागील ५ वर्षांपासून डायलेसिस क्षेत्रात सेवा देत आहेत. त्यांनी आजपर्यंत 80,000 हून अधिक डायलेसिस संस्थेद्वारे केले आहेत.
या कार्यक्रमस गुरु गौतम ट्रस्टचे सतीश बनवट, दिनेश मुनोत, संतोष भूरट, कोठारी चॅरिटेबल ट्रस्टचे शांतिलाल कोठारी , प्रफुल्ल कोठारी, दीपाली कोठारी, मितेश कोठारी, नूतन गुपचुप आदी उपस्थित होते.